पत्रकार कुरुमकर यांचा माध्यमिक शिक्षक सोसायटी व तहसीलदारांकडून गौरव
By : Polticalface Team ,30-04-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना नुकताच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून जिल्हा ग्रामीण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीत शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप यांनी सोसायटीच्या कार्यालयात यथोचित असा सन्मान केला. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सचिन शेलार; तुषार डगळे; शाखाधिकारी चौगुले; सामाजिक कार्यकर्ते अशोक वाल्हेकर; कार्यालयीन कर्मचारी कानिफनाथ तुरकुंडे; स्वप्निल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
तर श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात श्रीगोंद्याचे तहसीलदार मुदगुल; यांनी सन्मान केला याप्रसंगी नायब तहसीलदार नेवसे; पुरवठा निरीक्षक श्री कोरे; ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड गोरख कडूस पाटील अशोक वाल्हेकर बारीकराव वाल्हेकर आदी यावेळी उपस्थित होते.
माध्यमिक सोसायटीत आपल्या गौरवोद्गारपर भाषणात सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप यावेळी म्हणाले की; पत्रकार कुरुमकर हे आमचे स्नेही आहेत. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन आणि समाज यांच्याशी सुसंवाद साधत प्रत्येक प्रश्न समन्वयातून सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांनी आपली संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण केली. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांच्याकडे आज सर्वजण पाहत आहोत. त्यांचे पत्रकारितेतील व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ते ज्येष्ठ सभासद असून; या संस्थेच्या वाटचालीमध्ये देखील पत्रकार कुरुमकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने पुरस्कृत केल्याबद्दल आम्हालाही त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे संचालक जगताप यांनी सांगितले.
श्रीगोंद्याचे तहसीलदार श्री मुदगुल यावेळी आपल्या गौरवोद्गारपर भाषणात म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांची सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी नेहमीच तळमळ असते. जागतिक ग्राहक दिन व राष्ट्रीय ग्राहक दिनामध्यें पत्रकार कुरुमकर यांचा मोठा सहभाग असतो. अत्यंत संयमाने ग्राहकांचे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नांना वाचा कशी फुटेल:; यासाठी तहसील अंतर्गत विभागाशी ते नेहमीच सकारात्मक भूमिका घेतात. त्यातून अनेक ग्राहकांना न्याय दिला जातो. एक दूरदृष्टी लाभलेले पत्रकार असल्याने महसूल प्रशासनाला देखील पत्रकार कुरुमकर यांचे मौलिक मार्गदर्शन मिळते. त्यांचे पत्रकारितेतील कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवदगार तहसीलदार मुदगुल यांनी यावेळी काढले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
वाचक क्रमांक :