पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वातून उंची वाढवली
By : Polticalface Team ,30-04-2025
मुख्याध्यापक भास्कर जगताप
लिंपणगाव (प्रतिनिधी) पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात योगदान देत असताना कर्तृत्वातून आपल्या कार्याची उंची वाढविल्याचे गौरवउद्गार सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर जगताप यांनी काढले.
* पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी शैक्षणिक व वृत्तपत्रात प्रामाणिकपणे काम करताना समाजासाठी काहीतरी देणे लागतो या माध्यमातून त्यांनी दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्रात देखील प्रामाणिकपणे व निर्भीड असे प्रशासन असो अगर अन्य काही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव असे लिखाण करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासात उत्तम प्रकारे योगदान देऊन काम करत आहेत. त्या प्रित्यर्थ दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने त्यांना नुकतेच जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल लिंपणगावच्या सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांचा विद्यालयात पत्रकार कुरुमकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक श्री जगताप गुण गौरवपर भाषणात म्हणाले की; पत्रकार कुरुमकर हे नागवडे कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या विचारसरणीतून तयार झालेले व्यक्तिमत्व असून; ते तालुक्याच्या उर्वरित प्रलंबित विषयावर सखोल व सत्यावर आधारित लिखाण करत आहेत. त्यांच्या लेखणीची देखील प्रशासनाला दखल घ्यावी लागते. त्यांचे लिखाण हे प्रशासनाला निश्चितच दिशादर्शक ठरत आहे. कुरुमकर यांनी सहकार; शिक्षण; सिंचन; दळणवळण व शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत विषयांवर सतत अभ्यासपूर्ण लिखाण करून प्रशासनाला देखील जाणीव करून देत आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील गुणवंत विद्यार्थी; शिक्षक व विद्यालयांचे विविध स्पर्धा यांना वेळीच प्रसिद्धी देऊन प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कार्याचा पत्रकार कुरुमकर यांनी एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. असे सांगून श्री जगताप आणखी पुढे म्हणाले की; शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्याशी संपूर्ण जिल्ह्यात मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. तालुक्यात एक कर्तुत्ववान व गुणसंपन्न पत्रकार म्हणून ते परिचित आहेत. अशा या गुणसंपन्न पत्रकार कुरुमकर यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने जिल्ह्यात आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कृत केल्याबद्दल निश्चितच आम्हा सर्वांना त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. असे सांगून मुख्याध्यापक जगताप यांनी पत्रकार कुरुमकर यांना पुढील शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील पुढील पुढील वाटचालीसाठी परमेश्वराने शक्ती बुद्धी सामर्थ्य द्यावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. .
या सन्मान सोहळ्यासाठी ज्येष्ठ शिक्षक सर्वश्री शिवाजी नागवडे; गायकवाड सर; पवळसर; डोमाळे सर; श्रीमती मोरे; श्रीमती मासाळ; शिक्षकेतर कर्मचारी कातोरे सर; जीवन जाधव; संदीप गायकवाड; विजय बरकडे; नीता कुरुमकर आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक शिवाजी नागवडे यांनी केले आभार जीवन जाधव यांनी मानले.
वाचक क्रमांक :