By : Polticalface Team ,02-05-2025
नंदकुमार कुरुमकर
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा; पारनेर; कर्जत; आणि करमाळा या चार तालुक्यांना वरदान ठरलेला कुकडी कालव्याचे उन्हाळी हंगामासाठी आवर्तनासंदर्भात अखेर कालवा सल्लागार समितीचा मुहूर्त ठरला. आवर्तन सोडणे संदर्भात कालवा सल्लागार समितीची ५ मे रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या एका सूत्रांनी दिली.
दरम्यान उन्हाची तीव्रता अत्यंत भीषण आहे. त्यामध्ये आहे; त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. अशा परिस्थितीत कुकडी लाभ क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला गेला आहे. या लाभक्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी सर्वांनाच भटकंतीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामध्ये कुकडी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामासाठी कुकडीचे आवर्तन सोडताना या आवर्तनाला मोठा विलंब लागला गेला आहे. या कुकडी लाभ क्षेत्रातील पाणी प्रश्नाचे दुर्भिक्ष उन्हाळी हंगामातील शेती पिकांचे भविष्य या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी मागील आठवड्यात कुकडीचे उन्हाळी हंगामाबाबत आवर्तनाला मुहूर्त मिळेना. याबाबत जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाचे प्रखर लेखणीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाला जागा आली आहे. आता तातडीने कुकडीच्या आवर्तनासंदर्भात कालवा सल्लागार समितीची अहिल्यानगर येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
* कुकडी लाभक्षेत्रात वास्तविक पाहता श्रीगोंदा; पारनेर; कर्जत; करमाळा इत्यादी तालुक्यांची मोठी शेतजमीन ओलिताखाली येते. या शेतजमिनीला पाऊस आणि कुकडीच्या पाण्याच्या धर्तीवरच शेतकऱ्यांना पिके काढावी लागतात. त्यामध्ये या लाभक्षेत्रात फळबागांची संख्या देखील मोठी आहे. या फळबागांना ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत शेतकरी कुकडीच्या उन्हाळी हंगामातील आवर्तनावर भरवसा ठेवतात. वर्षानुवर्षे जतन केलेल्या फळबागा जगल्या पाहिजे. याबाबत शेतकऱ्यांची पाण्यासाठी मोठी धडपड असते. परंतु कुकडीचे रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन प्रत्येक वर्षी कोलमडते. असा आरोप देखील शेतकऱ्यांमधून वारंवार होताना दिसतो. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुकडी कालव्यावर आठमाही धोरणाचा समावेश आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आठ महिने धर्मानुसार आवर्तन सोडले जात नाही असा आरोप या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कुकडीचे उन्हाळी हंगामात एक व रब्बी हंगामात साधारणता दोन आवर्तने मिळतात. परंतु त्याही पाण्याला प्रतीक्षा करावी लागते. या आवर्तनाचा फॉर्मुला देखील टेल टू हेड असल्याने श्रीगोंदा; कर्जत; पारनेर इत्यादी तालुक्यांना करमाळ्याची भरणी झाल्यानंतर आवर्तन सोडले जातात. तोपर्यंत उन्हाळी हंगामात पाऊस आणि कुकडीचे पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके फळबागा जळून गेल्यानंतर कुकडीचे पाणी सोडण्यात येते. हा अनुभव शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून पाहिला. श्रीगोंदाच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन दोन महिन्यापूर्वी सोडण्यात आले. परंतु त्या आवर्तनात फक्त शेतकऱ्यांचे पाटच ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या आवर्तनात फक्त शेतकऱ्यांना सहा दिवसाचा अल्टिमेटन देण्यात आला होता. त्यामुळे अनेक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहिल्याचा आरोप देखील संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता. शेतकऱ्यांना कुकडी लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी हक्काचे पाणी जलसंपदा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अक्षरशा अश्रू आणण्यासारखे ठरले. दरम्यान आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आवर्तन नेमके? पिण्याच्या पाण्यासाठी की शेतीसाठी सोडणार? याबाबत पाच मे रोजी बैठकीत ठरणार आहे. सद्यस्थितीला कुकडीच्या धरणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी असल्याचे सांगितले जाते. मग पावसाळ्यामध्ये कुकडीची समाधानकारक धरणे भरले असताना हे पाणी नेमके गेले कुठे? असा संवाद देखील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. चारही तालुक्यांना पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाला पिंपळगाव जोगेतून येडगावच्या धरणात साधारणता साडेचार टीएमसीच्या पुढे पाणी सोडावे लागणार आहे. तरच चारही तालुक्यांची पाण्याची तहान भागणार आहे. असे देखील शेतकऱ्यांमधून तर्क व्यक्त करण्यात येत आहे याबाबत या चारही तालुक्यातील लोकप्रतिनिधी व खासदार कोणती भूमिका घेतात याकडे आता कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष