By : Polticalface Team ,04-05-2025
                           
              
   लिंपणगाव (प्रतिनिधी )--कामठी गाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांची रस्त्या संदर्भात व्यथा अत्यंत गंभीर होती. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दहा ते बारा वर्षांपासून  रस्त्याकडील शेतकऱ्यांनी चालू रस्ता बंद केल्यामुळे   मोजक्या शेतकऱ्यांनी मिळून पानंद रस्त्यासाठी जिल्हाधिकारी; तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला. परंतु कोणीही आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही पर्यायी रस्ता फॉरेस्ट मधून काढून आमच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता तयार केला. पण तो रस्ता कायमस्वरूपी नसल्याने पावसाळ्यात खूप अडचणी येत होत्या. म्हणून आम्ही दिनांक 30/4/2019 व 25/09/2020 रोजी तहसीलदार  यांना पुन्हा एकदा कोल्हेवाडी ते गवळवाडी पानंद रस्त्यासाठी अर्ज केला. तेथे सुद्धा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दि. 15/02/2021 रोजी लेखी स्वरूपात परत अर्ज केला. परंतु तेथून सुद्धा म्हणावे  असा प्रतिसाद भेटला नाही. शेवटी आम्ही शेतकऱ्यांनी मिळून 02/08/2021 रोजी तहसील ऑफिससमोर उपोषण केले. तेव्हा कुठे तरी आमच्या मागणीचा थोडाफार विचार करण्यात आला. व पानंद रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण शेतकऱ्यांना एकदा नोटीस काढण्यात आली. परंतु त्यानंतर तहसील ऑफिस सुद्धा पुढील कारवाईस तयार होत नव्हते.
     असे सांगून येथील शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की; आम्ही तीन चार शेतकऱ्यांनी मिळून शेवटी स्वखर्चाने ज्या ठिकाणी अतिक्रमण नाही.ल त्या ठिकाणी पानंद रस्ता जेसीबीच्या साह्याने खुला केला तेथे सुद्धा अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी खूप विरोध केला. त्यामुळे आम्ही निराश होऊन पानंद रस्त्याचा अट्टाहास जवळपास सोडला होता. परंतु दादासाहेब जंगले यांच्या पानंद रस्त्याच्या आंदोलनाबद्दल आम्ही वर्तमानपत्रात व मोबाईलवर वाचल्यानंतर आम्हाला थोडीशी आशा जागृत झाली. व आम्ही ताबडतोब दोन-तीन शेतकरी दादासाहेब जंगले पाटील यांना भेटण्यासाठी श्रीगोंदा येथे तहसील ऑफिस ला गेलो. तेथे झालेल्या मीटिंगमध्ये तात्कालीन तहसीलदार क्षितिजा वाघमारे तसेच शेत पानंदचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या बोलण्यावरून असे जाणवले की; आमचा प्रश्न हा हेच दोघे व यांची टीम मार्गी लावू शकते म्हणून आम्ही सतत जंगले पाटील व त्यांच्या टीम सोबत पाठपुरावा करत राहिलो. त्याचा आम्हाला परिणाम काल दिनांक 30/04/2025 रोजी श्री मोजणी अधिकारी पाटील यांच्या रूपात दिसून आला.  दादासाहेब जंगले पाटील व ॲड. कडूस पाटील यांनी प्रत्यक्ष पानंद रस्त्याची मोजणी चालू असताना येऊन भेट दिली. त्यामुळे विरोध करणारे शेतकरी हे सुद्धा शांत झालेले दिसून आले. व कोणीही शेतकरी परत विरोध करेल असे मला वाटत नाही. त्यामुळे आम्ही कामठी गावचे सर्व शेतकरी शिव पानंद रस्ता चळवळीच्या सर्व टीमच्या पवित्र कार्याबाबत समाधानी आहोत.
कामठी गावातील कोल्हेवाडी ते गवळवाडी या पाणंद रस्त्याची मोजणी पार पडली. 
यावेळी ग्रामसेविका बेरड , पोलीस महेश शिंदे, कामठी गावचे पोलीस पाटील दादासाहेब आरडे, योगेश शिंदे, अशोक आरडे, अंकुश शिंदे, भरत आरडे, कुंडलिक भिसे, पाराजी शिंदे, भागचंद शिंदे, महेश आरडे, कामठी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आरडे, तुळशीराम आरडे, आजिनाथ आरडे, रेवच्चंद आरडे, संभू आरडे, कामठी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दादासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी मोहन मामा शिंदे, कामठे गावचे सरपंच आप्पासाहेब टकले, ग्रामपंचायत सदस्य परशुराम शिंदे, ताराचंद आरडे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हेवाडी ते गवळवाडी पानंद रस्त्याची मोजणी पार पडली. लवकरच हद्द निश्चिती होऊन रस्ता खुला होईल अशी सर्व ग्रामस्थांना अशा निर्माण झाली.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष