इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!

By : Polticalface Team ,04-05-2025

इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!

 लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन या विद्यालयाच्या सन 1990 -91 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल 34 वर्षानंतर गळाभेट झाली.  शैक्षणिक वर्षातील त्या काळातील मुख्याध्यापक; शिक्षक; शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींना या स्नेह मेळाव्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी आमंत्रित करून  सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आनंदी वातावरणात जुन्या आठवणींना आपल्या गुरुजनांसमवेत विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे उजाळा दिला. विशेष म्हणजे या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करताना उन्हाची तीव्रता व स्नेह मेळाव्यात शालेय जीवनात ज्या आठवणी व क्षण होते त्या मनसोक्तपणे मोकळ्या करण्यासाठी काष्टी -श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावरील अनन्या हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते.. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी निरीक्षक आर के लगड हे होते. 


    यावेळी त्याकाळचे शिक्षक सर्वश्री अंकुश वाघ; शरदचंद्र क्षीरसागर; शहाजी कुतवळ; आदिनाथ पाचपुते; जिजाबाई कापरे मॅडम; श्रीमती अलका दरेकर मॅडम; विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव गवळी; नलगे मॅडम; भाऊसाहेब वाघ; शिवाजीराव भोसले; सय्यद सर; शेख सर लोकमतचे पत्रकार बाळासाहेब काकडे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; पत्रकार दत्ताजी जगताप आदी यावेळी उपस्थित होते. 

या 90- 91 च्या बॅचकडून या विद्यालयाला नवीन लॅब भेट देणार असल्याची घोषणा यावेळी आयोजकांनी केली.

      स्वागत पर भाषणात मुख्याध्यापक शिवाजी गवळी यावेळी बोलताना म्हणाले की; ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करिअर निवडले त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा निश्चितपणे आनंद निर्माण होईल. त्याबरोबरच मा. विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन उच्च पदावर पोहोचले याचा आम्हालाही शिक्षक म्हणून आनंद द्विगुणीत होत आहे सांगितले. 

    यावेळी पत्रकार बाळासाहेब काकडे आपल्या शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; शिक्षकांनी चांगले संस्कार व शिक्षण दिले म्हणूनच आपण सर्वजण प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकलो. जिथे ज्ञानदान घेतले. त्या ज्ञानमंदिराला कदापिही विसरता कामा नये. असा सल्ला माजी विद्यार्थ्यांना यावेळी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. 


   यावेळी माजी विद्यार्थी सतीश साळुंखे; राहुल वाबळे; चंद्रकांत वाजे; रामदास ठाकर; मीना जाधव; संगीता घालमे या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी त्या काळच्या शिक्षकांची शिस्त ही अत्यंत आमच्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरली. त्यामुळेच आम्ही प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकलो. अशा शब्दात या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना शिक्षकांसमोर मांडल्या.


     ज्येष्ठ क्रीडा मा. शिक्षक भाऊसाहेब वाघ आपल्या शुभेच्छा भर भाषणात म्हणाले की; प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे; योग्य आहार व नियमित व्यायाम ठेवला तर निश्चितपणे शरीर तंदुरुस्त राहू शकते. यासाठी संपत्ती पेक्षा शरीर संपत्तीकडे देखील अधिक लक्ष देण्याचा सल्ला यावेळी वाघ यांनी दिला. 


   मा शिक्षक शरदचंद्र क्षीरसागर यावेळी म्हणाले की; ज्या ठिकाणी काम करत असाल तिथे प्रामाणिकपणे काम करा. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल मात्र आई-वडिलांचा विसर होता कामा नये. आई-वडिल आहेत तोपर्यंत तीर्थक्षेत्र देखील करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आई-वडील हेच आपले दैवत आहेत. असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


     अध्यक्षीय भाषणात मा मुख्याध्यापक आर के लगड यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की; 3४ वर्षानंतर 90 91 च्या विद्यार्थ्यांनी भरीव परिश्रम घेऊन गुरु शिष्यांची भेट घडून आणली. हा दुग्ध शर्करा योग आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना चांगले विचार अंगीकारावेत. चांगल्या मित्रांची संगत करावी. शरीर तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करावा. प्रत्येकाने या धकाधकीच्या जीवनामध्ये एकमेकांच्या संकटात उभे राहावे. आधार द्यावा त्यातच खरे मित्रत्वाचे नाते तयार होणार आहे समाजामध्ये देखील या उपक्रमाचा चांगला संदेश जाणार आहे. असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

  स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत वाजे; रामदास ठाकर; सुभाष कुरुमकर; नारायण शेंडे; संतोष शिंदे; दत्ता नागवडे;  योगेश शेलार; भागवत; वायभासे; आदींनी मोठे परिश्रम घेतले.

    आभार व्यक्त करताना मेजर शिवाजीराव नलावडे यावेळी म्हणाले की; आमच्यावर शालेय जीवनात  शिक्षकांनी योग्य शिस्त; संस्कार व जीवनाला दिशा दिली. म्हणूनच आम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक जण आज सक्षमपणे उभा आहोत. सर्वांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थिती दाखवल्यामुळे तब्बल 34 वर्षाचे गुरु शिष्याचे नाते आणखी घट्ट होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. व उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.