By : Polticalface Team ,09-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा एच एस सी परीक्षेचा निकाल 78.94% लागला आहे. या जुनियर कॉलेजने निकालाची परंपरा आजपर्यंत कायम राखल्याबद्दल लोणी व्यंकनाथ येथील सेवा संस्थेकडून ज्युनिअर कॉलेजच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून पुढील शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. प्रामुख्याने ज्यनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी कोळपे भाग्यश्री यशवंत या विद्यार्थिनीने 68% गुण मिळवून प्रथम आली; तर द्वितीय क्रमांक देवखिळे श्रद्धा अंकुश तिने 66.83 व झंजाडे ज्योती सुरेश या विद्यार्थिनीने 66.83 टक्के गुण मिळवले. तर तृतीय क्रमांक कोळपे स्नेहल संतोष या विद्यार्थिनीने 65.83% गुण मिळवून निकालात तिसरा क्रमांक मिळविला. या चारही गुणवंत विद्यार्थिनींचा श्री व्यंकनाथ सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांनी यथोचित असा विद्यार्थिनींना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सन्मान सोहळ्यास नागवडे कारखान्याचे संचालक तथा स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे; सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात; श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सुनील म्हस्के; प्राचार्य ए. एल. पुराणे; जे. के. काकडे; शब्बीर शेख; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; प्रा पुष्पलता पाचपुते; प्रा निसार शेख; शिक्षकेतर कर्मचारी प्रज्ञा राहींज; एकनाथ नेटवटे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संचालक डी आर काकडे यावेळी म्हणाले की; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी खेडोपाडी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत आहे. सहकार महर्षी बापूंच्या दूरदृष्टीमुळेच सर्वसामान्यांना गावातच शिक्षण उपलब्ध होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा देखील सर्वांगीण विकास होऊन अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ पदावर कार्यरत आहेत. व्यंकनाथच्या ज्युनिअर कॉलेजने देखील निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी व प्राचार्य; प्राध्यापक यांचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी व्यंकनाथ सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यावेळी शुभेच्छापर भाषणात म्हणाले की; प्राध्यापकांनी प्रामाणिकपणे ज्ञानदान केल्यामुळेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले. विद्यार्थ्यांनी पुढील योग्य करिअरसाठी भरपूर ज्ञान मिळवून उच्च पदावर आपले कौशल्य प्राप्त करावे. असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना थोरात यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे की; या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जादातासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरीव ज्ञान देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहोत. विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट निकालासाठी भरीव असे योगदान देत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांना उत्तुंग असे यश मिळत आहे. असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सुनील म्हस्के यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी उत्तुंग यश व भरारी घ्यावी. असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन प्रा निसार शेख यांनी केले आभार प्रा पुष्कलता पाचपुते यांनी मानले.
वाचक क्रमांक :