आवाटी येथील कुमारी गुलनाज शेख हिचे उच्च माध्यमिक परीक्षेत घवघवीत यश प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवले प्रथम श्रेणीचे गुण
By : Polticalface Team ,10-05-2025
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील रहिवाशी तसेच करमाळा येथे मोटार मेकॅनिकल चे काम करणारे अबूबकर आदम शेख यांची मुलगी कुमारी गुलनाज शेख हिने नुकत्याच पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून तिला 82.33% गुण मिळाले आहे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे ग्रामीण भागातून विशेष अभिनंदन केले जात आहे
गुलनाज शेख हि करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कला शाखेत शिक्षण घेत होती तिने अथक परिश्रम व अहोरात्र अभ्यास करीत याशिवाय कोणतीही ट्युशन न लावता सदरचे यश संपादन केले आहे तिचा यशवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील तसेच उप प्राचार्य संभाजी किरदाक यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे
करमाळा येथील मोटर मेकॅनिकल अर्थात फिटर म्हणून कार्यरत असलेले तसेच आवाटी येथील रहिवासी असलेले अबू बकर आदम शेख यांची ती मुलगी असून आवाटी येथील वली चांद पाशा दर्गाहचे खादिम इरफान कादरी तसेच ग्रामपंचायत सदस्य तनवीर शेख यांची ती पुतणी आहेत
गुलनाज शेख यांनी मिळवलेल्या तिच्या यशाबद्दल विशेषता आवाटी तसेच परिसरातील भागातून तिचे विशेष तोंड भरून कौतुक होत आहे आपण पुढे विधीज्ञ अर्थात वकील होण्याचा आपला संकल्प असल्याचे गुलनाज शेख यांनी बोलताना सांगितले
वाचक क्रमांक :