बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटून डोक्याला लाकूड लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By : Polticalface Team ,10-05-2025

बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटून डोक्याला लाकूड लागल्याने  महिलेचा दुर्दैवी मृत्यू करमाळा : शेतात बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटल्याने लाकूड डोक्याला लागल्याने बिटरगाव श्री येथे ३४ वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनीषा नितीन मुरूमकर असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चायत दोन मुलं, एक मुलगी, पती, सासू व सासरे असा परिवार आहे. बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरूमकर यांची सून व पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या त्या चुलत भावजयी होत्या. मनीषा मुरूमकर या पती नितीन मुरूमकर व लहान मुलगा यांच्याबरोबर सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात बोअरमधील विद्युतपंप काढण्यासाठी गेल्या होत्या. बोअरवेलमधील विद्युतपंपाचे दावे टीपाडावरून ट्रॅक्टरला बांधून ओढायचा प्रयत्न सुरु असताना दावे तुटले आणि त्यातील लाकूड मनीषा मुरूमकर यांच्या डोक्याला लागले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. मनीषा मुरूमकर यांचा लहान मुलगा जवळच होता. मोठा मुलगा काळा पाईप धरून ओढत होता. एकजण बोअरमधील केबल धरत होता. दरम्यान दावे तुटून मुरूमकर यांच्या डोक्याला लाकूड लागले. त्यानंतर त्यांना तत्काळ माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, वैभव मुरूमकर, मधुकर शिर्के, भाऊसाहेब बाबर, गणेश बाबर यांनी करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना बुधवारी (ता. ७) तेथील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. बिटरगाव श्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शुक्रवारी (ता. १६) संगोबा येथे त्यांचा दशक्रियाविधी होणार आहे. मुरूमकर यांच्या या अपघाती निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या अतिशय मनमिळावू होत्या. त्यांचे सासर हे बिटरगाव श्री येथील होते. माजी सरपंच शिवाजी बाबर यांची त्या मुलगी होत्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.