अखेर दोन दशकापासूनच्या प्रलंबित रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रवाशी व वाहन चालकांमधून समाधान

By : Polticalface Team ,12-05-2025

अखेर दोन दशकापासूनच्या प्रलंबित रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रवाशी व वाहन चालकांमधून समाधान लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील अनेक रस्ते दोन दशकापासूनचे प्रलंबित् व खड्डेमय रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाल्याने दळणवळण मोठ्या प्रमाणात सुरळीत होऊन अनेक वाहनचालक प्रवासी यांचे मणक्याचे आजार काही अंशी दूर झाल्याचे वाहन चालक व प्रवाशांनी सांगितले. दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेटचे अकराशे मीटर काम संपूर्ण तर लिंपणगाव ते मुंढेकरवाडी; लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे मागील महिन्यात मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले. हे रस्ते अत्यंत वाहतुकीच्या दृष्टीने दुरापस्त झाले होते. या मार्गावर सहकारी साखर कारखानदारी; बँक असल्याने हे रस्ते जवळपास दोन दशके खड्डेमय काटेरी झाडे व अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले गेले होते. त्यामुळे या रस्त्यातून पायी चालणे देखील मुश्किल बनले होते. या सर्व रस्त्यांच्या दुरावस्थेकडे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी फेरफटका मारून रस्ते प्रसिद्धीच्या झोतात आणले. प्रसंगी वेळोवेळी प्रसिद्धीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग इत्यादींचे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात काही महिन्यापासून मालिका सुरू केली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला या नादुरुस्त रस्त्यांची दखल घ्यावी लागली. आणि कामही मार्गे लागले आता फक्त या रस्त्यांचे साईड पट्ट्यांची कामे बाकी आहेत. तर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट दरम्यान अडीचशे मीटर खड्डे मध्ये रस्त्यांची देखील दुरुस्ती होणे बाकी आहे. ते देखील सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतील; अशी अपेक्षा आहे. या तीनही दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते प्रशासनाच्या दृष्टिक्षेपात आणल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी उपलब्ध करून टेंडर नुसार या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले. आता या तीनही मार्गातील रस्ते श्रीगोंदा -काष्टी -लिंपणगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी या क्रमांकाची जोड रस्ते ठरले आहेत. त्यामुळे या तीनही नादुरुस्त रस्त्याने डांबरीकरण व मजबुतीकरण झाल्याने मोकळा श्वास घेतला आहे. वाहतूकदार प्रवासी यांचाही प्रवास सुखकर व सुलभ झाला आहे. प्रसंगी रस्ते उत्तम प्रकारे झाल्याने अनेक सभासद कामगार प्रवासी वाहन चालक यांचे मनक्यासारखे दुर्धर आजार कमी होताना दिसत आहे. कशा प्रतिक्रिया देखील वाहनचालक व प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त करत या वीस दशकापासून प्रलंबित रस्ते दुरुस्त करण्यासाठी पत्रकार कुरुमकर यांनी अखेरपर्यंत पाठपुरावा करून रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली. कुरुमकर यांच्या निर्भीड लेखणीमुळेच या नादुरुस्त रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले. या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा येथील उपअभियंता श्री होके यांनी देखील अगदी प्रामाणिकपणे या रस्त्यांचा सर्वे करून निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल पत्रकार नंदकुमार कुरुमकर व उपअभियंता श्री होके यांचे वाहन चालक व प्रवाशांनी भरभरून कौतुक केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष