उध्दटला सोमवारपासून उदमाई देवीची तीन दिसव याञा उत्सव
By : Polticalface Team ,12-05-2025
जनआधार न्युज भिमसेन जाधव मो. 9112131616 ता:इंदापुर (उध्दट ) 11 येथे वैशाख शुद्ध पौर्णिमेला उदमाई देवी याञोत्सवाला सुरुवात होत असून, हा उत्सव सोमवार (ता. १२ते ता. १४)असा तीन दिवस सुरु राहणार आहे. सोमवारी पहाटे पाठपूजा आणि महापूजा होऊन देवीच्या पालखीचे उध्दट गावाहुन वाजत गाजत प्रस्थान होईल. सायंकाळी आतषबाजी पहायला मिळणार आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता देवीचा भव्य छबीना आणि गुलाल घेऊन महापूजा होणार असून या तीनही दिवसाच्या काळात कुस्त्याचे जंगी मैदान, ऑर्केस्ट्रा, तमाशा अशा विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीने केले आहे गावोगावी चालणाऱ्या यात्रेची सांगता उदमाई देवीच्या यात्रेने होत असल्याने या यात्रेला हिंगणेवाडी मानकरवाडी तावशी सपकाळ वाडी कुरवली थोरातवाडी चिखली जांब घोलपवाडी उदमवाडी थोरात वस्ती या बारा गावातून व परिसरातून गर्दी होत असते नवसाला पावणारी देवी म्हणून उदमाई देवीचा नवलौकिक असल्याने अनेक वर्षापासून पंचक्रोशीतील भाविक भक्ताने या यात्रेत सहभागी होतात उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिरावर विविध रोषणाई केली असून मंदिराच्या परिसरात खेळण्याची दुकान हॉटेल्स पाळणे यांनी फुलायला सुरुवात झाली आहे
वाचक क्रमांक :