वांगदरी गावात बिबट्याचे पुन्हा दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम, पत्रकार कुरुमकर यांनी वनविभागाला कल्पना देतात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल

By : Polticalface Team ,12-05-2025

वांगदरी गावात बिबट्याचे पुन्हा दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम,  पत्रकार कुरुमकर यांनी वनविभागाला कल्पना देतात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावात बिबट्याचे १० ते 15 दिवसानंतर पुन्हा दर्शन झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. यासंदर्भात शेतकरी भाऊसाहेब राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की; गावातील शेतकरी बी. जी. काटे व पोपटराव राऊत हे सकाळी सात वाजता इनामगाव वांगदरी रस्त्यातून नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत असताना या दोन्हीही शेतकऱ्यांना साधारणता 200 फुट अंतरावर बिबट्या सैरावैरा पळत असल्याचे दिसले. बिबट्या दिसल्यामुळे या दोन्हीही शेतकरी पुन्हा तेथूनच माघारी गावाकडे फिरकले. त्यांनी काही शेतकरी व प्रवाशांना त्या रस्त्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगूनच प्रवास करावा अशा सूचना दिल्या. दरम्यान गेल्या दहा दिवसांपूर्वी याच परिसरात शेतकरी पोपटराव राऊत यांना त्यांच्या शेतात बिबट्या एका सिमेंट पाईपमध्ये दबी धरून बसल्याचे श्री राऊत यांनी तात्काळ ही घटना वांगदरी गावचे सरपंच संजय काका नागवडे यांच्यासह ग्रामस्थांना दिली. सरपंच नागवडे यांनी तात्काळ रेंज फॉर ऑफिसर दिपाली भगत यांना घडल्या घटनेची कल्पना दिली. त्यांनी स्वतः व आपल्या कर्मचाऱ्यांसह फौज फाटा वांगदरी येथील घटनास्थळी पाठवला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पिंजरा लावला परंतु सिमेंटी पाईपच्या दुसऱ्या बाजूने या बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याची सुटका झाल्यामुळे वांगदरे गावचे ग्रामस्थ व सरपंच आक्रमक बनले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूने जाळी लावली असती तर बिबट्या निश्चितच जेरबंद झाला असता. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी या संदर्भात हलगर्जीपण केल्याचा आरोप देखील उपस्थित सरपंच संजय नागवडे व ग्रामस्थांनी केला होता. सोमवारी 12 मे रोजी सकाळी सात वाजता बिबट्याने याच परिसरात पुन्हा दर्शन दिल्याने वांगदरी गावात बिबट्याची दहशत मात्र कायम दिसून येत आहे. त्यामुळे शेतीची कामे देखील ठप्प आहेत. या बिबट्याच्या संदर्भात शेतकरी भाऊसाहेब राऊत यांनी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. असता पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ रेंज फॉरेस्ट ऑफिसर दिपाली भगत यांच्याशी संपर्क साधून वांगदरी गावातील बिबट्या संदर्भात माहिती दिली. असता तात्काळ रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्रीमती भगत यांनी वनपाल रंजना घोडके यांच्यासह वन कर्मचारी संभाजी शिंदे रामदास पळसकर शिवाजी कुनगर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात सांगितले. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून जेथे बिबट्या दिसला तिथे आमच्या वनविभागाने पिंजरा देखील लावलेला आहे. परंतु तो वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलतो दिशा बदलतो यासाठी शेतकऱ्यांनी देखील दक्ष राहायला हवे असे सांगितले. यावेळी रेंज फॉरेस्ट ऑफिसर दिपाली भगत त्यांच्याशी पत्रकार कुरुमकर यांनी संपर्क साधला त्या म्हणाले की; वांगदरी गावात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामध्ये नदीचा देखील येथे उगम आहे. बिबट्याला दडण्यासाठी या परिसरात साधन आहे. ग्रामस्थांनी शेतात मध्ये जाताना सावधानतेने जावे; आसपास पहावे; हातामध्ये काठी ठेवावी अशा सूचना केल्या त्याबरोबरच येथील शेतकऱ्यांनी पिंजऱ्यामध्ये बिबट्याच्या भक्षणासाठी बकरी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्या भक्षणाच्या आशेने बिबट्या निश्चितपणे पिंजऱ्यामध्ये अडकला जाणार आहे. त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. असे रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्रीमती भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष