छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांच्या विद्यालयांचे दहावी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल

By : Polticalface Team ,13-05-2025

छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांच्या विद्यालयांचे दहावी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल

  संस्थेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागून प्रथम क्रमांक तर व्यंकनाथ विद्यालयाचा 99 टक्के निकाल लागून गुणवत्तेत प्रथम क्रमांक  तर संस्थेत दुसरा क्रमांक


लिंपणगाव( प्रतिनिधी) मार्च 2025 मध्ये पुणे विभागीमंडळाकडून घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षांचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला असून; श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांच्या सर्वच शाखांचे उत्कृष्ट निकाल लागले आहेत. या संस्थेच्या श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून; संस्थेत या विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. तर लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा 99% निकाल लागून गुणवत्तेत प्रथम तर संस्थेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या शिक्षण संस्थेतील विद्यालयांचे एकूण निकाल व प्रथम आलेले तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे:- 


    टाकळी कडवळीत येथील श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा शंभर निकाल लागला आहे. या विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:- प्रथम क्रमांक वाळुंज वैष्णवी नवनाथ 87%; द्वितीय क्रमांक सोनवणे जानवी दादा 81.40%; तृतीय क्रमांक वाळुंज ज्ञानेश्वरी किशोर चंद ८०.४० टक्के; वाळुंज गौरी भाऊसाहेब 80.40%; याच शिक्षण संस्थेतील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा 99% निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक शिंदे सोनल बापू ९४.६०; तर द्वितीय क्रमांक वडवकर सुप्रिया सुरेश 93.40%; तृतीय क्रमांक डांगे स्नेहा संतोष 93.20%; चतुर्थ क्रमांक वागस्कर तेजस संदीप याला 90.60% गुण मिळाले आहेत.; या शिक्षण संस्थेचे पिंपरी कोलंदर येथील वसंत दादा पाटील विद्यालयाचा 96.67% निकाल लागला असून; प्रथम क्रमांक दिघे भूमिका ज्ञानदेव 82.20%; द्वितीय क्रमांक ओहळ रोनक दादा 79.20%; तृतीय क्रमांक सलोनी सुनील ओव्हाळ 74.20%; पवार दिशा विशाल 74.20% तर; हंगेवाडी येथील श्री हंगेश्वर विद्यालयाचा 96.97% निकाल लागला आहे. या विद्यालयात प्रथम क्रमांक जगताप भाग्यश्री रामदास 94.20%; द्वितीय क्रमांक शेलार तनुजा सुदाम 89%; तृतीय क्रमांक धायगुडे साक्षी ज्ञानदेव 87.20% क्रमांक; रायकर साक्षी किसन ८६.८०%; रायकर प्रगती दत्तात्रेय 85.80% रायकर कार्तिकी रंगनाथ 85.80%; पिंपळगाव पिसा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल 94.44% या विद्यालयात प्रथम क्रमांक देणगे प्रणव दत्तात्रेय ८६.२० ;द्वितीय क्रमांक घालमे काव्या विजय 85.60%; तृतीय क्रमांक पंधरकर वैष्णवी गोपाळ 85.20% ;पवार गायत्री निलेश 81.40%; तर पेडगाव येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा 92.10 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयात प्रथम क्रमांक जाधव दीक्षा गणेश 77%; द्विती क्रमांक काशीद सायली लक्ष्मण 74 टक्के; काटकर हर्षदा दादा 70.60%; पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाचा 88.89% निकाल लागला. त्या विद्यालयात प्रथम क्रमांक हिरवे समृद्धी नाना ८२.४० टक्के; द्वितीय क्रमांक दहिवले रागिनी सुहास हिला ८१..४० टक्के गुण मिळाले. तृतीय क्रमांक गोरखे नम्रता शिवाजी 81.20% ;तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा 84.21 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयात प्रथम क्रमांक कुरुमकर सानिका 90.60%; द्वितीय क्रमांक चव्हाण प्रज्वल 88. 80%; तृतीय क्रमांक बारवकर ज्ञानेश्वरी 81.20%; जंगले ऋतुजा 81 टक्के; हे सर्व विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड आदींनी अभिनंदन करत गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.