स्मृतींचा सोहळा! छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

By : Polticalface Team ,14-05-2025

स्मृतींचा सोहळा! छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

घोगरगाव | प्रतिनिधी – श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगावच्या सन २००७-०९ च्या ज्युनियर कॉलेज बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

हा आगळावेगळा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात पार पडला असून, त्यात माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी प्राचार्य तथा रयत कौन्सिल सदस्य मा. तुकाराम कन्हेरकर सर, भगत सर, माजी प्राचार्य अविनाश गांगर्डे सर, रजनी गांगर्डे मॅडम, हिराबाई खंडागळे मॅडम, ज्ञानेश्वर गांगर्डे सर, मुख्याध्यापक नरवडे सर व जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कन्हेरकर सरांनी विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या या स्नेहबंधनाचे कौतुक करत सांगितले की, "पैसा आणि आनंद या वेगवेगळ्या गोष्टी असून, सच्चा आनंद हा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. अशा कार्यक्रमांमुळे गुरु-शिष्य नात्याचे बंध अधिक दृढ होतात."

कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी अक्षय पवार यांनीही उपस्थिती लावून शिक्षकांना स्वतःचा काव्यसंग्रह भेट दिला.

कार्यक्रमात सहभागी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, प्रगतीचा प्रवास आणि गुरुजनांविषयीचा आदर व्यक्त केला. सर्वांनुमते शाळेच्या ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके भेट देण्याचा संकल्प करण्यात आला.

या प्रसंगी विद्या डोके, जयश्री उगले, शितल बेरड, कोहक वंदना, पूनम लुनिया, अश्विनी शेळके, जयश्री पठारे, वंदना तरटे, दिपाली लुनिया, जाहिरा शेख, उज्वला कोरडे, गौतम गारुडकर, अंबादास गारुडकर, किशोर गुंजाळ, अतुल बाबर, विकास वाळके, ज्ञानेश्वर विटकर, आणि अन्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब तरटे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी तर आभार प्रदर्शन जाहिरा शेख यांनी केले. या स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी किशोर गुंजाळ, शितल गुंजाळ, अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी विशेष परिश्रम घेतले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.