शेतकऱ्यांचे हक्कासाठी प्रशासन सज्ज बंद व अतिक्रमित शिवार रस्त्यासाठी गावोदवंडीचे शासनाचा आदेश जारी

By : Polticalface Team ,14-05-2025

शेतकऱ्यांचे हक्कासाठी प्रशासन सज्ज बंद व अतिक्रमित शिवार रस्त्यासाठी गावोदवंडीचे शासनाचा आदेश जारी

लिंपणगाव (प्रतिनिधी)--श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे शिवार रस्ते, गाडी रस्ते, पाणंद आणि शेतीशी निगडित मार्ग हे गाव नकाशामध्ये असूनही प्रत्यक्षात बंद पडलेले, अतिक्रमित किंवा वापरात नसलेले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा करण्यासाठी महसूल विभागाने निर्णायक पावले उचलली आहेत.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार तहसीलदार श्रीगोंदा यांनी सर्व ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना खालील सूचना दिल्या आहेत:

. गाव दवंडीद्वारे सूचना पुढील पमाणे;

गाव नकाशामध्ये नमूद असलेले पण सध्या बंद / अतिक्रमित असलेले शिवार रस्ते, गाडी रस्ते, पाणंद यासंबंधीची माहिती गावकऱ्यांना दवंडी देऊन कल्पना द्यावी यामध्ये संबंधित मार्गावरून अतिक्रमण करणाऱ्यांना लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यास सांगावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करावे;.

. रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा

 अशा बंद/अडथळाग्रस्त रस्त्यांची माहिती, स्थिती, व अडचणी असलेली ठिकाणे अहवालाद्वारे वरिष्ठ कार्यालयात सादर करावीत.

. भविष्यातील विकासकामांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी;

 शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणारे रस्ते कायमस्वरूपी खुले राहतील याची खात्री प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. 

आदेश काढून त्याची प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलबजावणी चालू केल्याबद्दल तालुका प्रशासनाचे चळवळीचे  राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व ॲड कडूस पाटील  यांनी आभार व्यक्त केले आहेत

 

 *श्रीगोंदा तहसील कार्यालयाने हा पुढाकार घेऊन, गावागावांत अडथळा निर्माण करणारे सर्व रस्ते मोकळे करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. हे पाऊल शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एक मोठे समर्थन ठरणार आहे.राज्यातील इतर तालुक्यातील प्रशासनाने श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे आदेश आदेश काढावेत - राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील 

   

हा निर्णय हा केवळ प्रशासनिक आदेश नसून, तो शेतकऱ्यांच्या जगण्याच्या हक्काशी संबंधित आहे. गाव दवंडी हे लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी प्रभावी साधन असल्याने, त्याचा वापर करून जनजागृती करणे अनिवार्य आहे.

     प्रभारी तहसीलदार प्रवीण मुदगुल


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी