खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण
By : Polticalface Team ,14-05-2025
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पुणे विभागाच्या एसएससी बोर्डामार्फत मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 90% च्या जे गुण प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांना श्री व्यंकनाथ विद्यालयाचे स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी प्रत्येकी 1100 रुपये घोषित करण्यात आले होते. त्या गुणवंत विद्यार्थ्यांना श्री काकडे यांनी विद्यालयात शानदार सोहळ्यामध्ये सन्मान करून बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
दरम्यान स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे हे विद्यार्थी प्रिय आहेत. ते नेहमीच गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना कोणताही उपक्रम असो अगर शासकीय परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळवले. त्या विद्यार्थ्यांना विद्यालयात येऊन बक्षीस रूपाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. त्यांमध्ये श्री काकडे यांनी एसएससी परीक्षेत कितीही विद्यार्थी 90% च्या पुढे गुणवत्तेत विद्यार्थी चमकले. तर त्यांना प्रत्येकी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढवतात. हा निश्चित खंडेराव काकडे यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यामध्ये मार्च 2025 मध्ये श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या चार विद्यार्थिनी प्रामुख्याने सोनल शिंदे; सुप्रिया वडवकर; स्नेहा डांगे; तेजस वागस्कर या चार विद्यार्थ्यांनी गुणांनुक्रमाने 90% च्या पुढे उत्कृष्ट गुण मिळवले. त्यांचा विद्यालयात स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचे स्कूल कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येकी अकराशे रुपये प्रमाणे एकूण चार हजार चारशे रुपये बक्षीसाचे वितरण करण्यात आले. व गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; माजी संचालक विलासराव काकडे; स्कूल कमिटीचे सदस्य पुरुषोत्तम लगड; खंडेराव काकडे; अकबरभाई इनामदार; संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात; माजी प्राचार्य रंगनाथ राजापुरे सर; माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे सर; रयतेचे माजी प्राचार्य एम आर पवार सर; सेवानिवृत्त शिक्षक एन टी शेलार सर; उपसरपंच हनुमंत मगर; ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे; राहुल गोरखे; दिगंबर साळवे; विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे सर; यांच्यासह प्रा निसार शेख; शिक्षक संतोष शिंदे; मनोज कांबळे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; एकनाथ नेटवटे; राहुल येरकळ आदिसह गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
वाचक क्रमांक :