इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय
By : Polticalface Team ,16-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) - सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचलित श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे, इंदिरा गांधी पॉलिटेक्निक 1982 मध्ये स्थापन झाले आहे. ए.आय.सी.टी.ई च्या मानांकनानुसार भव्य इमारत बांधलेली आहे.या संस्थेचे कामकाज अध्यक्ष आदरणीय श्री.राजेंद्र दादा नागवडे, व्हाईस चेअरमन श्री. बाबासाहेब भोस व सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच निरीक्षक सचिनराव लगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पॉलीटेक्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या शाखेमध्ये तीन वर्षाचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच एका वर्षासाठी सायबर सिक्युरिटी व सीएनसी मशीन टेक्निक हे कोर्सेस उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई मार्फत होणाऱ्या वार्षिक मूल्यांकनामध्ये पॉलिटेक्निकला अतिउतृष्ठ श्रेणी प्राप्त झालेले श्रीगोंदा परिसरातील एकमेव पॉलिटेक्निक आहे. सर्व शाखांसाठी सुसज्ज अद्यावत व आधुनिक उपकरणाचा समावेश असलेल्या प्रयोगशाळा वर्कशॉप उपलब्ध आहेत., सर्व संगणक लॅब, लँग्वेज लॅब, कॉम्प्युटर सेंटर हे इंटरनेट सुविधा, डिजिटल प्रोजेक्टर आणि अद्यावत सॉफ्टवेअर सुसज्ज आहेत. वर्ग खोल्यांमध्ये इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड असलेले श्रीगोंदा तालुक्यातील पॉलिटेक्निक आहे तसेच येथे स्मार्ट शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध आहेत. सुरक्षेतेसाठी पॉलिटेक्निक मध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या पॉलीटेक्निक मध्ये प्राध्यापक वर्ग उच्चशिक्षित आणि अनुभवी आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर दिला जातो.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2024 च्या परीक्षेमध्ये 94.11% गुण मिळालेले विद्यार्थी आहेत तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे पॉलिटेक्निकचा प्लेसमेंट सेल सक्रिय असून बजाज ऑटो लिमिटेड, टाटा मोटर्स,एपिटोम लिमिटेड,महालक्ष्मी लिमिटेड यासारख्या नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ची संधी मिळाली आहे. दहावी नंतर प्रथम वर्षचा डिप्लोमा व बारावी सायन्स/ आय.टी.आय नंतर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा या पॉलिटेक्निकला आहे, तरी डिप्लोमा प्रवेशासाठी आजच आपल्या इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी येथे संपर्क साधावा, असे आव्हान प्राचार्य प्रशांत दत्तात्रय भोईटे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.