संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

By : Polticalface Team ,18-05-2025

संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला पुणे जिल्हा प्रतिनिधी भिमसेन जाधव मो. 9112131616 पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहरात बदली, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. राज्यांत राज्य गृह विभागाकडून सध्या पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश जारी होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून संदीप गिल यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून शनिवारी दुपारी मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहरांत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे याबाबत शुक्रवारी राज्य गृह विभागाने आदेश दिले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेले संदीप गिल यांची यापूर्वीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. अखेर देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यानंतर गेली यांना पोलीस उपयुक्त पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश पुणे शहरांचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. संदीप गिल यांनी परिमंडळचे पोलीस उपायुक्त पदावर असताना गणेशोत्सवातील बंदोबस्त तसेच अनेक महत्त्वांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सातत्याने संवाद साधल्यामुळे गिल हे पुणे शहरांत लोकप्रिय अधिकारी ठरले होते. सर्व समाज घटकांमध्ये थेट मिळून मिसळून राहणारा अधिकारी म्हणून त्यांचा चांगलाच नावलौकिक आहे. संदीप गिल हे एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणूनही त्यांना चांगले ओळखले जाते. तर मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून देशमुख देखील नेहमीच प्रयत्नशील राहिले, यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक दालनात संदीप गिल यांचे स्वागत करीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोपविली. रोज पहा. जन आधार न्युज
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी