दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
By : Polticalface Team ,20-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २० मे २०२५ महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी दौंडचे आमदार अॅड राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच विधानभवन, मुंबई येथे या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अँड राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
आमदार अँड कुल यांचे वडील दिवंगत आमदार कै.सुभाष अण्णा कुल यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याच पद्धतीने, आमदार अँड कुल यांना मागील कालावधीत पहिल्यांदा विधानसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती.
पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. ही संधी दिल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुलजी नार्वेकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे आमदार अँड कुल यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक उपक्रमांचे कार्य अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि जनहित केंद्रित राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक व निष्कलंक पद्धतीने समितीचे कार्य चालवले जाईल अशी ग्वाही दिली.
सार्वजनिक उपक्रम समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती असून राज्यातील विविध सरकारी कंपन्या महामंडळे आणि इतर सार्वजनिक संस्था यांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवण्याचे काम ही समिती करते. यामुळे या समितीच्या अध्यक्षपदावर आमदार कुल यांची निवड ही दौंडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
यावेळी राज्याचे महालेखाकार (वाणिज्यिक) श्री. दत्तप्रसाद शिरसाट, आमदार मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा अत्राम, अभिजित वंजारी, विलास भुमरे, सुलभा खोडके, विधीमंडळ सचिवालय समितीचे अवर सचिव श्री. आशिष जावळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.