पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान
By : Polticalface Team ,20-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना नुकताच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा लोणी व्यंकनाथ येथील ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून स्वर्गीय सुनील पांडुरंग पाटील सभागृहात यथोचित गौरव करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मनीषाताई नाहटा व गावचे पोलीस पाटील मनेष जगताप तसेच सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार कुरुमकर यांच्या पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल उपस्थित मान्यवरांनी स्तुती सुमने वाहिली.
यावेळी उपसरपंच हनुमंत मगर; भाऊसाहेब डांगे; नीलिमा थोरात; चंद्रकला पवार; गणेश काकडे; राहुल गोरखे; मयूर गोरखे; महादेव पवार; गणेश गायकवाडसर; स्वप्निल गायकवाड; रवी वडवकर; प्राचार्य ए. एल पुराणे; शिक्षक सर्वश्री प्रा. निसार शेख; ज्ञानदेव धायगुडे; तुषार नागवडे; सविता मगर मॅडम; अश्विनी शेळके मॅडम; नौशाद शेख मॅडम; राहुल येरकळ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा निसार शेख यांनी केले. आभार उपसरपंच हनुमंत मगर यांनी मानले.
वाचक क्रमांक :