बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध

By : Polticalface Team ,20-05-2025

बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास  वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध बारामती जन आधार भिमसेन जाधव मो 9112131616 शहरांमधील गट क्र. 6/3/अ,ब, 6/4/अ, 6/4/अ/1, ही जागा इनाम वर्ग 6 ब (महार वतन) जागा आहे या जागेवर एसटी महामंडळाने बेकायदेशीर ताबा घेऊन बस स्थानक बांधले आहे. या जागेचे मूळ मालक अनुसूचित जातीतील महार जातीचे आहेत. ही जागा ताब्यात घेत असताना संबंधित मालकांना कोणतेही प्रकारची नोटीस अथवा पूर्व सूचना दिलेली नाही. या जागेची 7/12 उतारे आजही संबंधित मूळ मालकांच्या नावावरती आहेत संबंधित मालकांनी याबाबत अनेक निवेदने मोर्चे आंदोलने केलेली आहेत. यावर मा. उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी करत असताना दिनांक 18/10/1968 व दिनांक 24/06/ 1970 च्या मा. उपविभागीय अधिकारी यांच्या ऑर्डर दाखवत आहेत एका ऑर्डर नुसार वतनी जागेवरती अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले म्हणून त्यांना या जागेमधून बेकायदेशीर ताबेधारक म्हणून काढून टाकले व दुसऱ्या ऑर्डर नुसार वतनी जागेवर अतिक्रमण धारक असल्याने शर्तीचा भंग झाला म्हणून सदरील जागा ताब्यात घेतल्या आहेत अशा दोन्ही ऑर्डर तात्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी केलेले आहे ही ऑर्डर इंग्लिश मध्ये केलेली आहे. मुळात अशा प्रकारच्या ऑर्डर करायचे अधिकार महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम 1959 या अधिनियमातील तरतुदीनुसार मा. उपविभागीय अधिकारी यांना नाहीत या अधिनियमानुसार सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वरील अधिकारी यांना आहेत असे असताना त्यावेळी असणारे मा. उपविभागीय अधिकारी यांनी वरील प्रकारच्या बेकायदेशीर ऑर्डर करून शासन नियमांचा भंग केला आहे व संबंधित मूळ मालकांवर अन्याय केला आहे. या बेकायदेशीर ऑर्डरचा इफेक्ट या जागेच्या सातबारावर झालेला नाही त्यामुळे ही जागा आजही मूळ मालकांच्या नावावरती आहे. तरी देखील या जागेची संपादन झालेले नसताना ही जागा मूळ मालकांच्या नावे असताना तसेच या जागेवरती बांधकाम करण्याबाबत कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे या जागेवरती बारामती बस स्थानक बांधण्यात आलेला आहे व या जागेमध्ये बांधकाम करून गाळे काढण्यात आलेले आहेत या गाळ्यांचे निलाव करण्यासाठी अथवा हे गाळे भाड्याने देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग पुणे यांच्यामार्फत बारामती बस स्थानकामधील रिक्त वाणिज्य आस्थापना, चालवण्यास देण्यासाठी ई-निविदा सूचना क्र. 04/2025-26, दि.13/05/2025 रोजी प्रसारित केली आहे. या जागेचे कोणत्याही प्रकारची संपादन झालेली नसताना, बेकायदेशीरपणे या जागेवरती बांधकाम करून गाळ्यांचे निलाव करण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी जे कोणी बारामती बस स्थानक मध्ये गाळे घेणार आहेत त्यांना आवाहन केले की, बारामती बसस्थानकांमधील गट क्र. 6/3/अ, ब, 6/4/अ, 1 ही जागा महार वतनी जागा आहे व आज ही मूळ मालकांच्या नावे आहे. या जागेचे बसस्थानकासाठी कोणतेही प्रकारे संपादन झालेले नाही या जागेवरती बांधकामाची कोणतीही परवानगी नाही हे प्रकरण जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर चौकशीसाठी दाखला आहे. एस टी महामंडळ ने हे प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत याच्या निविदा काढू नये त्या रद्द कराव्यात तसेच या ठिकाणी गाळे घेणाऱ्यांनी या जागेचे सातबारे उतारे एस टी महामंडळाच्या नावे आहेत का? या जागेचे संपादन झाले आहे का? वर नमूद गटांमध्ये बांधकामाची परवानगी घेतली आहे का? याची तपासणी करावी कारण उद्या जाऊन कोर्टाच्या माध्यमातून सदरील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबतच्या आदेश होऊ शकतात तसेच सदरील जागा मूळ मालकांना परत देण्याचे आदेश होऊ शकतात त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी व बारामती बस स्थानकामध्ये गाळे घेऊ नये. असे आव्हान केले. यावेळी मोहन शिंदे, लक्ष्मण सोनवणे, कृष्णा साळुंके, चैतन्य साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.