शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

By : Polticalface Team ,21-05-2025

शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

लिंपणगाव ( प्रतिनिधी) दि २० मे २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता पुणे विभागीय उपसंचालक कार्यालय पुणे येथे पुणे विभाग उपसंचालक सुनंदा वाखारे (ठुबे), वेतन अधीक्षक रामदास म्हस्के, लेखा अधिकारी मनोज शिंदे, सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार(सोळंकी), लिपिक योगेश सुरवसे आदी अधिकारी यांच्या उपस्थितीत व शिक्षक भारती संघटना अहिल्यानगर यांच्या समवेत सविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षक भारती पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा.महेश पाडेकर, उच्चमाध्यमिक जिल्हाध्यक्ष प्रा.रामराव काळे, महिला अध्यक्ष प्रा.रूपाली कुरुमकर, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. जगताप, पुणे महिला अध्यक्ष प्रा.प्राजक्ता जाधव, अहिल्यानगर उपाध्यक्ष प्रा.सचिन जासूद, कोषाध्यक्ष प्रा.गोपाल दराडे,सहसचिव प्रा.राहुल कानवडे, जिल्हा संघटक प्रा.चंद्रशेखर हासे, पाथर्डी तालुकाध्यक्ष प्रा.अकिल फकीर, उपाध्यक्ष प्रा.संतोष आठरे, मार्गदर्शक प्रा.संतोष नवले, श्री.विजय पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहविचार सभेत पुढील विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.


प्रामुख्याने शिक्षक भारती ही एकमेव शिक्षकांची शासन मान्य संघटना असल्याने दर तीन महिन्याला सहविचार सभा घेण्यात यावी.

 शिक्षणाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी अहिल्यानगर यांचे शिक्षकांशी व संघटना पदाधिकारी यांच्याशी वर्तन चांगले असावे यावेळी शिक्षण उपसंचालक यांनी कर्मचारी,अधिकाऱ्यांना समज दिली यापुढील वर्तन शिक्षक, कर्मचारी व संघटना पदाधिकारी यांच्याशी चांगले असेल.मागील तीन वर्षापासून थकीत देयके, घडाळी तत्वावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित देयके संदर्भात प्रा. महेश पाडेकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे वेतन अधीक्षक रामदास म्हस्के यांनी सांगितले की सी.एच.बी. देयके जून महिना अखेर होतील व थकीत देयकाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे) यांच्याकडे निधी मागणी केली आहे निधी उपलब्ध झाला की लगेच थकीत प्रलंबित देयके अदा करण्यात येतील.

 अंशतः अनुदानित त्या अनुदानित प्रलंबित बदली मान्यता प्रस्ताव मंजूर करावे असा प्रश्न प्रा.रूपाली कुरुमकर यांनी उपस्थित केला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश असून अंशतः अनुदानित त्या अनुदानित प्रलंबित बदली मान्यता त्वरित द्याव्यात यावेळी उपसंचालक सुनंदा वाखारे व लिपिक योगेश सुरवसे यांनी सांगितले की मा. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांना मार्गदर्शन मागवले आहे. त्यांचे पत्र आले की; बदली मान्यता देण्याचे ठरले.


    * शालार्थ आय.डी. अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्वरित द्यावे; हा प्रश्न प्रा. रुपाली कुरूमकर यांनी उपस्थित केला. त्यावेळी लिपिक योगेश सुरवसे यांनी सांगितले की; पुणे विभागीय बोर्डात १५७ फाईल पाठवले आहेत. आणखी २८३ फाईल अहिल्यानगर जिल्ह्याच्या पेंडिंग राहिल्या आहेत. त्या विभागीय बोर्ड अध्यक्ष यांच्याकडे ५० च्या टप्प्याने पडताळून पाठवण्यात येईल; असे उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी सांगितले.

 पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जिल्हाध्यक्ष प्रा.रामराव काळे यांनी सांगितले की; पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेली शिक्षक यांची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करून नियमित वेतनश्रेणी मान्यता प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात प्रलंबित आहे. त्या त्वरित द्यावेत; यावर उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी त्या पडताळून त्वरित देण्यात येतील असे सांगितले.

 

    जिल्हाध्यक्ष प्रा.रामराव काळे यांनी अर्धवेळ ते पूर्ण वेळ मान्यता तसेच अर्धवेळ मान्यता देण्यात याव्यात असे प्रश्न उपस्थित केला यावेळी उपसंचालक सुनंदा वाखरे यांनी सांगितले की प्रस्ताव पडताळणी करून देण्यात येतील.

 प्रा.महेश पाडेकर यांनी सन 2022 ते 2024 पर्यंतच्या संच मान्यता प्रचलित पद्धतीने करण्यात याव्या ग्रामीण आदिवासी डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्या प्रथम तुकडी ६० व द्वितीय ४० असे असून यावर सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार मॅडम यांनी उच्च माध्यमिक शाळांना २४ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णया नुसार संच मान्यता केल्या आहेत तरीदेखील ज्या उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी संख्येची अडचण असेल त्यांची ६०+४०  अशी विद्यार्थी संख्या धरली असून त्यांच्या संच मान्यता देण्यात आले आहेत. यावरही काही उच्च माध्यमिक विद्यालयाचे अडचण असेल तर त्यांनी सहाय्यक उपसंचालक परिहार मॅडम यांना भेटून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

९) प्रा.महेश पाडेकर यांनी आदिवासी उपयोजन क्षेत्रात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदिवासी भागात असेपर्यंत एकस्तर वेतन श्रेणी संदर्भात मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व मा.कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांचे पत्र असून देखील शिक्षण अधिकारी(माध्यमिक) यांनी त्यावर निर्णय घेतला नाही ज्या शाळांचे प्रस्ताव प्रलंबित असेल प्रस्ताव मंजूर करून पत्र द्यावे असा प्रश्न उपस्थित केला ते तात्काळ दिले जातील असे वेतन अधीक्षक रामदास मस्के यांनी शिक्षणाधिकारी अहिल्यानगर यांच्यावतीने सांगितले.

 वाढीव पद अतिरिक्त शिक्षक समायोजन संबंधित महाविद्यालयात हजर करून घेत नाही. असा प्रश्न प्रा. महेश पाडेकर यांनी उपस्थित केला. सदर शिक्षकांवर अन्याय होऊ नये गेल्या दोन महिन्यापासून संबंधित शिक्षक उपसंचालक कार्यालय पुणे व सोलापूर येथे हेलपाटे मारत आहेत .त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचे समायोजन त्वरित करावे; असे सांगितले. यावेळी उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी सदर कॉलेजने शिक्षकास हजर करून घेतले नाही तर ते पद व्यपगत करावे असे आदेश काढण्याचे सांगितले.

सहविचार सभा झाल्यापासून आठ दिवसात सहविचार सभेचे  इतिवृत्त संघटनेस देण्यात यावे.


सदर वरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन शिक्षण विभाग अधिकारी व संघटना पदाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच मार्गी लावले जातील व पुढील तीन महिन्यात पुन्हा सहविचार सभेचे आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले. 

यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा संघटक प्रा चंद्रशेखर हसे यांनी सर्वांचे आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.