By : Polticalface Team ,23-05-2025
बारामती जन आधार न्युज भिमसेन जाधव मो 9112131616 हाताला काम नाही, पोटाला आन नाही, त्यात हा महागाईचा भडका, मुलांचे शिक्षण, आजारपण, जगण्याचा संघर्ष,
लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी काय तरी कराव म्हणून बचत गटाचे कर्ज काढून छोटासा व्यवसाय सुरु केला.
चार दिवस व्यवसाय चांगला चालाय लागला सर्व काही हळूहळू सुरुळीत चालाय लागत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी आली कर्मचाऱ्यांनी दमदाटी कराय सुरुवात करत मालाची नासदुस करून गाड्या सहित सर्व माल भरून नेला, आता व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला, कस बस कार्यकर्त्यांच्या मदतीने गाडा सोडवला पण मालाची नुकसान झाली माल भरायला पैसे नाहीत, त्याच नगरपालिकेने पथविक्रेत्यांसाठी कर्ज मिळेल अशी एक योजना काढली होती त्यात अर्ज करून कर्ज घेतले कर्ज घेताना आम्हाला अधिकृत ठरवून कर्ज दिले माल भरून पुन्हा व्यवसाय चालू केला.
व्यवसाय करत असताना रस्त्याच्या कामाची पाहणी कराय दादा आले आमच्या व्यवसायाकडे हात करत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला काही तरी सांगितले दुसऱ्या दिवशी परत अतिक्रमणची गाडी आली उद्या पासून येथे व्यवसाय करू नका असे कर्मचारी सांगू लागले सर्व व्यवसाय करणारे आता करायचे काय? या प्रश्नात पडले कार्यकत्यामार्फत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले पण मला दादाचा आदेश आहे तुम्ही दादाला भेटा म्हणत टाळाटाळ करणारी उत्तरे मिळू लागली आमचं संरक्षण भारतीय संविधानाने केले आमच्यासाठी पथविक्रेता संरक्षण अधिनियम 2014 चा कायदा आहे त्यानुसार आमचं सर्व्हेशन करा, आम्हाला व्यवसाय करून जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला प्रमाणपत्र द्या, होकर झोन तयार करा हे केले नाही तर तुम्हाला कायाद्या नुसार कार्यवाही करता येत नाही हे सांगून, निवेदन देऊन पण दुसऱ्या दिवशी निनावी नोटीसा दिल्या आता आंदोलना शिवाय पर्याय नाही म्हणून नगरपालिकेसमोर आंदोलन चालू झाले नगरपालिकेने भेटण्याची वेळ दिली वेळेनुसार भेटाय गेले असता अधिकारी भेटत नाही दादा भेटा सांगण्यात आले, मग काय पोटासाठी काही कराव लागलं तरी करायचं म्हणून दादालाच अडवायचं ठरलं मोर्चाकडून आक्रोश सुरु झाला आक्रोश मोर्चा दादाच्या पक्षकार्यालयावर गेला मुख्याधिकारी व दादा विरोधात घोषनाचा आक्रोश सुरु झाला लोक पोटासाठी आक्रोश करत चालू होता., दादा कारखान्याच्या इलेक्शन मुलाखाती घेत इलेक्शन कसे जिंकायचे याचे मार्गदर्शन करत होता.
आंदोलन चालू असताना दादाचा निरोप येतो 2 वाजता वाड्यावर या तिथे भेटतो सकाळपासून भर उन्हात आंदोलन चालू असल्याने आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले नाही हितेच भेटा नंतर दादाचा परत निरोप आला भेटतो घोषणा देऊ नका भेटतो म्हणाल्यामुळे घोषणा बंद करून दादाची वाट बघत सर्व आंदोलक रस्त्यावर बसले बराच वेळ होऊन पण दादा काय खाली येईना 2 वाजत आले सांगितल्याप्रमाणे दादाने 2 वाजवल्या बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर दादा खाली आले दादा.. दादा.. करत आंदोलक दादाला थांबवू लागले दादाची सुरुवातच उर्मट भाषेत सुरु झाली रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करायचा नाही तुम्ही अधिकृत आहे का? तुम्ही ते सावलीसाठी कापड बांधता रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करता कस दिसत ते, कोणी येतोय काही करतोय, मला असलं चालणार नाही. आंदोलन गाराने गात होते लोक गरीब आहे काहीतरी पर्याय काढा, दादा म्हणले काय पर्याय तुम्हाला सांगितल्याला कळतं बावळट आहे तुम्ही असे बोलून पुन्हा दादाने मुख्याधिकारी आणि डी वाय एस पी ला आंदोलकांचे म्हणणे ऐकून घ्यायला सांगितले आणि आंदोलकांचा प्रश्न न सोडवता निघून गेला.
यातून स्पष्ट झाले कि पथविक्रेत्यावर कार्यवाही करायला दादा सांगतोय इलेक्शनच्या टाइम आला कि दादा हातपाय जोडतो आणि इलेक्शन झाले कि जनतेच्या पोटावर उठतो म्हणून म्हणायचं आहे
दादा पाठीवर मारा, पोटावर नको...
मंगलदास निकाळजे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व
मो. 8390041414
वाचक क्रमांक :