संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

By : Polticalface Team ,24-05-2025

संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

श्रीगोंदा प्रतिनिधी/शफीक हवालदार श्रीगोंदा : पेडगावचे सुपुत्र युवा लेखक, कवी कृष्णा भगवान घोलप लिखित संत शेख महंमद महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित " Two Saints One Thought..." दोन संत एक विचार या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. तुकाराम रोंगटे, मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे हस्ते व डॉ. श्रीरंजन आवटे, राज्यशास्त्र अभ्यासक व लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. सामाजिक द्वेशाच्या रस्त्यावर भिंत म्हणून उभी राहण्यात या पुस्तकाचा नक्कीच खरीचा वाटा असणार आहे; असा आशावाद आवटे यांनी व्यक्त केला. तसेच कृष्णाने फक्त या पुस्तकात दोन संप्रदायांचीच सांगड नव्हे तर विद्यापीठातील दोन विभागांची सुद्धा सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कृष्णा इंग्रजी विभागाचा विद्यार्थी आहे आणि प्रकाशन सोहळा मराठी विभागामध्ये संपन्न झाला. असेही मान्यवरांनी मत व्यक्त केले. एकीकडे पदव्युत्तर शिक्षण नुकतंच पूर्ण होणे आणि त्याच कालावधीत स्वतःचा शोध निबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करणे, हे कार्य इतर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कृष्णा सारख्या इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.

पुस्तकाविषयी:

खरंतर हे पुस्तक म्हणजे कृष्ण घोलप या एम. ए. इंग्रजीचे शिक्षण नुकतेच पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध निबंध आहे. जो पुस्तक रूपाने त्याने प्रकाशित केला आहे. त्याच्या विभागाने त्याला तशी परवानगी दिली. शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र, अशा बहुविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनातूनच कृष्णाने हे कार्य केले आहे. " संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्या विशेष संदर्भाने सुफी संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा तुलनात्मक अभ्यास" असा घोलप यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. संत शहामुनी या संताला देखील प्रकाशझोतात आणण्याचे काम या शोधनिबंधातून केलेले आहे. कृष्णाच्या संशोधनातून एक गोष्ट त्यांनी मांडली आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ही संत शहामुनी यांची जन्मभूमी असण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी काही संदर्भही दिलेले आहेत. तसे पाहता सर्वच संतांचे विचार हे सारखे आणि एकच आहेत. परंतु या पुस्तकात लेखकाने विशेषतः सुफी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या तुलनात्मक अभ्यासावर प्रकाश टाकला आहे. त्यासाठी संत तुकाराम आणि संत शेख महंमद या दोन समकालीन संतांचा मुख्यत्वे विचार केला आहे. पुस्तकाचे शीर्षक दोन संत एक विचार आहे. त्यातून कृष्णा लेखकाला हेच सांगायचे आहे की, संत देहरूपाने जरी वेगळे असले तरी त्यांचा विचार एकच व सारखा आहे. इथे दोन हा शब्द देहाची भिन्नता दाखवतो व ती फक्त संत तुकाराम व संत शेख महंमद यांनाच नव्हे तर, सर्वच संतांच्या बाबतीत लागू पडते की, सर्वच संत देहरूपाने जरी वेगळे असले तरी त्यांचे कार्य व विचार एकच व सारखा होता व आहे . त्यामुळे इथे देहाची भिन्नता असेल. विचारांची नाही.  कम्पॅरिटीव्ह स्टडी हा साहित्यातील एक प्रकार आहे. जो दोन साहित्य किंवा गोष्टींचा अभ्यास करताना तुलनात्मक दृष्टिकोन राखतो. या तुलनात्मक दृष्टिकोनाचा उद्देश कुठल्यातरी एका गोष्टीला श्रेष्ठत्व देणे नसून सदर दोन गोष्टींना योग्यरीत्या समजून घेणे हा असतो. एम.ए. इंग्रजीच्या अभ्यासक्रमात देखील कम्पॅरिटीव स्टडी हा विषय शिकवला जातो. त्याचेच हे फळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 

यावेळी लेखक कृष्णा घोलप म्हणाले की, संत शेख महंमद महाराज व संत तुकाराम महाराज यांनी घालून दिलेली सामाजिक सलोख्याची शिकवण एकत्रितपणे या पुस्तकात मांडली असुन ती जागतिक दर्जावर नेण्याचा मानस आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी विद्यापीठातील विविध विभागांचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यापीठातीलच काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळीच असंच काहीतरी कार्य करण्याचा, आपले विचार, संशोधन पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा निश्चय देखील केला. तसे त्यांनी आपल्या भाषणातून व्यासपीठावर व्यक्तही केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल