पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी

By : Polticalface Team ,24-05-2025

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत  ,   साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी


    लिंपणगाव (प्रतिनिधी )--श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याची दहशत काही थांबण्याच्या मार्गावर नाही. तालुक्यातील प्रत्येक गावात आता बिबट्याने भक्षणासाठी लक्ष केले आहे. पाळीव जनावरे व माणसांवर बेधडक हल्ले करताना दिसत आहेत त्यामध्ये अनेक निष्पाप प लोकांचा बळी जात आहेत. सद्यस्थितीला नदीकाठावरील गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मागील महिन्यात इनामगाव येथील एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून उसात फरपटत त्याबरोबर वांगदरी गावात एका शेतकऱ्याच्या सीमेंटी पाईप मध्ये बिबट्या दबी धरून बसला होता. तो तेथील शेतकऱ्यांनी पाहिला शेतकऱ्यांनी व गावच्या सरपंचांनी बिबट्याची खबर संबंधित रेंज फॉरेस्ट ऑफिसर व वन कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांचा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले नाही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने तेथून पलायन केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वन कर्मचारी देखील तात्काळ तिथे दाखल झाले. सिमेंट पाईपच्या एका बाजूने जाळी लावली परंतु दुसऱ्या बाजूने त्याने पलायन केले. अजूनही वांगदरी गावात बिबट्याची दहशत कायम असल्याचे देखील सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले. आता बिबट्याने पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर मोर्चा वळविला आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजता शंकर सखाराम साबळे यांच्या वस्तीवर बिबट्या भक्षणासाठी आला. त्या बिबट्याला शंकर साबळे यांच्या घरात समोरील पाळीव कुत्रा दिसला. त्या कुत्र्यावर बिबट्याने जोराची झडप मारली. त्याचा आवाज शंकर साबळे यांना येताच शंकर साबळे यांनी दरवाजा उघडला दरवाज्याचा मोठा आवाज येताच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला. शनिवारी सकाळी शंकर साबळे यांनी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना बिबट्या संदर्भात कल्पना दिली. पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ रेंज फॉरेस्ट ऑफिसर दिपाली भगत; व वनपाल रंजना घोडके यांना घडल्या घटनेची माहिती देऊन तात्काळ कर्मचाऱ्यांमार्फत बिबट्याचे ठसे घेऊन नेमका हा बिबट्या कुठे गेला आहे. याची माहिती त्वरित घ्यावी. अशा सूचना केल्यानंतर वनपाल घोडके मॅडम यांनी तात्काळ वन कर्मचारी हुंबरे यांना घटनास्थळी माहिती घेण्याच्या सूचना केल्या. दरम्यान पिंपळगाव पिसा साबळे वस्ती येथे हंगा नदीचा उगम आहे. तेथे बिबट्याला दडण्यासाठी मोठी जागा आहे. त्याबरोबरच काटेरी झाडांचा देखील आसरा बिबट्या घेत असावा. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिबट्याला जेरबद करण्यासाठी पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्ती जवळ पिंजरा लावण्याची आवश्यकता असल्याचे पिंपळगाव पिसा येथील ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याची दहशत मात्र या परिसरात कायम आहे.

      दरम्यान तालुक्यात सिंचन क्षेत्र मोठे असल्याने उसाचे क्षेत्र देखील मोठे आहे परंतु सद्यस्थितीला  शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी गेल्याने सर्वत्र जमिनी शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवले आहेत त्यामुळे बिबट्याला दडण्यासाठी केवळ नदी काठावरील काटेरी झाडातच आश्रय घेत असल्याचे दिसते दक्षिणासाठी मात्र बिबटे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलतात वाड्या वस्त्यांवर जिथे दाट काटेरी झाडे आहेत तिथे बिबटे आश्रय घेतात रात्री अचानक कुत्रे पाळीव शेळ्या मेंढ्या जनावरे यांच्यावर बेधडक हल्ले  करून बळी घेत आहेत त्यामध्ये शासनाने वन प्राण्यांसाठी एक वेगळा कायदा केल्यामुळे कोणीही बिबट्या दिसले तरी त्याला मारण्याचे धाडस करत नाही परंतु एकीकडे मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते अशा परिस्थितीत शासनाने कुठेतरी हल्ले करणाऱ्या प्राण्यांवर कायद्यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.