अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
By : Polticalface Team ,25-05-2025
करमाळा प्रतिनिधी
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूलची कुमारी सभ्यवी नवनाथ शेंडगे इयत्ता तिसरी हिने300 पैकी 294 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. चि. रुद्रांश सूर्यकांत पाटील इयत्ता दुसरी याने 100 पैकी 88 गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. तसेच चि. शुभम संतोष नलवडे इयत्ता दुसरी याने 100पैकी 84 गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, सचिव प्राध्यापक अर्जुन सरक सर, प्राचार्य आबासाहेब सरवदे सर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे सर, उपप्राचार्य एन.डी.कांबळे सर, पर्यवेक्षक बी.एस.शिंदे सर विभाग प्रमुख नितीन पाटील सर व सर्व शिक्षकांनी केले.
वाचक क्रमांक :