By : Polticalface Team ,25-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) शालेय जीवनातील मित्र असावेत परंतु ते संकट काळात उभे राहावेत. असे मित्रत्व असावेत मित्र संकटात सापडला तर मित्रांनीच त्या मित्राला धाडसाने व धैर्याने उभे राहण्यासाठी मदत करणे म्हणजे तो माणुसकी जोपासणे हा हेतू असतो. मग तो मित्र कोणताही व्यवसायात असू देत. असाच एक प्रसंग इंदिरा गांधी विद्या निकेतन या विद्यालयाचे इयत्ता दहावीचे शैक्षणिक वर्ष 90 -91 या वर्षातील माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांचे अनेक वर्षांपासूनचे श्रीगोंदा शहरात स्वीट होमचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांनी त्यांच्या कौशल्यावर; जिद्दीवर श्रीगोंदे शहरात अगदी हवाहवासा वाटणारा केला. परंतु १५ मे रोजी सकाळी अचानक त्यांच्या स्वीट होमच्या दुकानात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण स्वीट होमचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी जळून गेले. त्यांचे जवळपास 50 लाखाच्या पुढे नुकसान झाल्याचे समजले. ही बातमी त्याकाळी शिक्षण घेत असलेल्या इंदिरा गांधी विद्यानिकेतन या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या वर्ग मित्रांना समजले. या सर्व वर्गमित्रांना व्यवसाय करत असताना मित्राचे अतोनात नुकसान झाल्याची बातमी वाचण्यात आली. या सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांना या नुकसानीची खबर दिली. हा व्यवसाय पुन्हा जिद्दीने सुरू करण्याचा सल्ला सर्व वर्ग मित्रांनी चंद्रकांत वाजे यांना दिला. . एवढे मोठे नुकसान कुणाचेच होऊ नये परंतु ते आपले कर्म म्हणून हा प्रकार घडल्याचे वाजे यांनी सांगितले. मितृत्वाचे दान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. या वर्ग मित्रांनी जवळपास वाजेंना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिक मदत म्हणून एक लाख एक हजार रुपये व्यावसायिक चंद्रकांत वाजे यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव गवळी व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्या हस्ते 25 मे रोजी प्रदान करण्यात आली. यावेळी वर्गमित्र दत्तात्रय नागवडे; बाळासाहेब फापाळे ग्रामपंचायत सदस्य मढेवडगाव; भागवत वायबसे; सुभाष कुरुमकर; मिलिंद नागवडे; संतोष शिंदे; सतीश धलंगे नारायण शेंडे आदी वर्गमित्र यावेळी उपस्थित होते.
यावेळी ऋणनिर्देश करताना चंद्रकांत वाजे यावेळी म्हणाले की श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्यालयात शिक्षण घेताना शालेय जीवनात लहानपणापासून वर्ग मित्रांची मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. ते जवळपास 25 वर्षापासून आजही नाते घट्ट आहे. माझ्या व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. मित्रांना अतिशय दुःख झाले. सर्वांनी फोन द्वारे चौकशी केली मन हलके करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला. संकटकाळात मला दिलेला या माझ्या वर्ग मित्रांनी आधार ही माझ्यासाठी अनमोल देणगी आहे. यापुढे कोणत्याही वर्गमित्रावर असा प्रसंग येऊ नये; परंतु आलाच तर आम्ही सर्वजण एकोप्याने त्या मित्राला आधार देण्याचे निश्चित काम करू; अशी ग्वाही देत श्री वाजे यांनी पुढे म्हटले आहे की या माझ्या वर्ग मित्रांचा मी सतत ऋणी राहील असे सांगून सर्व मित्रांचे आभार व्यक्त मानले..