आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

By : Polticalface Team ,25-05-2025

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते लिंपणगाव (प्रतिनिधी) आई ही विश्वाची जननी आहे. आईची माया मुलांसाठी अनमोल आहे. त्यामुळे वृद्धापकाळात आईचा विसर होता कामा नये असे भावनिक विचार जेष्ठ कीर्तनकार ह भ प हरिभाऊ महाराज गीते यांनी आयोजित प्रवचन रुपी सेवेत व्यक्त केले. लिंपणगाव येथील ज्येष्ठ आदर्श माता कै. जिजाबाई माधवराव कुरुमकर यांच्या दशक्रिया विधी निमित्त प्रवचन रुप सेवा वांगरी तालुका श्रीगोंदा येथे अंबिका मातेच्या प्रांगनात आयोजित करण्यात आली होती. त्या प्रवचनभूमी सेवेत उपस्थित भाविक व ग्रामस्थांना संबोधित करताना गीते महाराज यांनी पुढे म्हटले आहे की; महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अद्याप पर्यंत अतिरेकी निर्माण झाले नाहीत. या महाराष्ट्रात अनेक संत देखील होऊन गेले आहेत विविध संस्कृतीने व संत विचाराचा हा महाराष्ट्र आहे.. अनेक थोर महात्म्यांचे या महाराष्ट्रामध्ये पुण्यक्रम आहेत. अशा या महाराष्ट्रात जन्मदात्या आई-वडिलांची मात्र मोठी परवड होताना दिसते. पत्नीच्या प्रेमापोटी आईला वृद्धाश्रम मुले दाखवतात. त्या जन्मदात्या मुलांना काय म्हणावे. जन्मदाती मुले ही आईचा सांभाळण्यासाठी सौदा करतात. ही मात्र मोठी शोकांतिका आहे. अशा या जन्मदात्या मुलांना परमेश्वर नक्कीच माफ करणार नाही. याउलट आईने मुलाला जन्म घालताना किती यातना सहन केल्या असतील याची परिशिमा नाही. लिंपणगावच्या एक आदर्श ज्येष्ठ माता जिजाबाई कुरुमकर यांचे जीवन मात्र संघर्षातून यशोगाथेकडे गेले. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही माता महाराष्ट्रात प्रथमच असावी. धार्मिक क्षेत्रात या जिजाबाईंनी अन्नदान; धान्यदान; गोरगरिबांना आधार; याबरोबरच गावच्या दिंडी सोहळ्याला; मंदिराला; भजनी मंडळाला; देखील भरभरून आर्थिक मदत दिली. अशा या ज्येष्ठ आदर्श मातेला भगवंताच्या कृपेने 105 वर्ष वय लाभले. सहा मुलांनी देखील त्यांची भरभरून सेवा केली. अखेरपर्यंत त्यांना उत्तम आरोग्य लाभले. मात्र कर्माने कुणालाच सोडले नाही. असे सांगून गीते महाराज आणखी पुढे म्हणतात की; काहींचे आयुष्य हे दुःखामध्ये जाते. ते देखील कर्म समजले जाते. देवाला काहीही लागत नाही. तो फक्त शुद्ध अंतकरण मागतो. असे सांगून कुरुमकर परिवाराच्या आदर्श माता जिजाबाई कुरुमकर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर आईचे महत्व किती अथांग सागरासारखे आहे हे पटवून दिले. यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; वांगदरी गावचे माजी सरपंच विठ्ठलराव नागवडे; नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठल जंगले; माजी उपसभापती हरिदास शिर्के; बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे सर; दत्तात्रय खळदकर; आदींनी यावेळी जिजाबाई कुरुमकर यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिजाबाई कुरुमकर यांचे पुत्र हरिश्चंद्र कुरुमकर पंडितराव कुरुमकर मधुकर कुरुमकर सुभाष कुरुमकर अरविंद कुरुमकर जालिंदर कुरुमकरयांच्यासह श्रीगोंदा तालुका तसेच लिंपणगाव पंचक्रोशीतील राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आप्तेष्ट नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मा चेअरमन दादासाहेब कुरुमकर यांनी केले तर कुरुमकर परिवाराच्यावतीने ऋणनिर्देश सिद्धेश्वर सेवा संस्थेचे मा चेअरमन प्रवीण कुरुमकर व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू