ता. इंदापूर | जन आधार न्यूज | प्रतिनिधी - भिमसेन जाधव | मो. 9112131616
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीकडून अकलूजकडे जाणाऱ्या मार्गावर, कळंब आणि चिखली दरम्यान असलेल्या पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होता. या जोरदार प्रवाहात दुधाचा एक टँकर अडकला. टँकरमध्ये अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सुनिता सिकंदर साठे (वय 38) आणि त्यांचा मुलगा कार्तिक सिकंदर साठे (वय 10) अडकले होते.
याशिवाय, टँकरचा चालक आणि कळंब येथील ग्रामस्थ तानाजी कदम, अमोल डोंबळे व सोमनाथ जमदाडेही या घटनेत अडकल्याची माहिती मिळताच, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार महेश पवार, विकास निर्मळ आणि हरिश्चंद्र जगताप यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या धाडसी पोलिसांनी कोणताही विलंब न करता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात जाऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांचे धाडस आणि तत्परता सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनीही या बचावकार्यात पोलिसांना मोलाची मदत केली. संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा आपत्ती काळात पोलीस आणि नागरिकांचे समन्वय किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित झाले आहे.
वाचक क्रमांक :