सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,27-05-2025

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये सात सेवकांचा सेवानिवृत्तीचा समारंभ,अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका व अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ अनुराधावहिनी नागवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळेस त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष श्री बाबासाहेब भोस होते, आपले मनोगत व्यक्त करताना वहिनी म्हणाल्या, बापूंच्या विचारांचा वसा आणी वारसा सर्वच सेवकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला त्यामुळेच तालुक्यात सुजाण पिढी निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुसंस्कृत वळणवाट देण्याचा प्रयत्न हि ह्या सेवकांनी केला असे सांगितले, शिकवण्याचे प्रामाणिक काम तर यांनी केलेच, पण बापूंच्या विचाराला कधीही तिलांजली ह्या सेवकांनी दिली नाही महाविद्यालय आदर्श बनविण्यासाठी ह्या सेवकांनी काबाडकष्ट केले, ह्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालतात पोकळी निर्माण होईल परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रदादा नागवडे ती पोकळी भरून काढतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्था ऋण व्यक्त करीत आहे, असे ही त्या. मनोगतात म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले, त्यात ते म्हणाले की , ज्या सहकाऱ्यांसमवेत मी काम केले ते सुरवातीला एक सहकारी म्हणून व नंतर प्राचार्य म्हणूनही प्रत्येकवेळेस त्या सर्व सहकार्यांनी आपले काम प्रामाणिक केल्याचेही सांगितले व ह्या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्त करून बापूंचा विश्वासही ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मिळवला होता असे सांगितले व त्यांच्या ज्ञानाचा फायदा महाविद्यालयाला इथून पुढच्या काळातही व्हावा व त्यासाठी आपण योगदान द्यावे हा आशावादही व्यक्त केला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्तींचेही मनोगत झाले त्यामध्ये प्रा सुनंदा मोरे मॅडम यांनी बापूंची आठवण काढत असताना माझ्यावर मुलीसारखे प्रेम त्यांनी केले व मी नागवडे कुटुंबाचीच एक सदस्य आहे याची जाणीव मला पदोपदी जाणवली त्यानिमित्त नागवडे कुटुंबाचे ऋण व्यक्त केले तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्य श्री भगवान सोनवणे यांनी, त्याकाळची खडतर परिस्थिती, बापूंची आठवण काढताना त्यांनी बोट धरून मला विद्यार्थी म्हणून महाविद्यालयामध्ये आणले व त्याच महाविद्यालयाचा उपप्राचार्य पदावर नियुक्त केले त्याबाबत बापूंची कृतज्ञता व्यक्त केली, बापूंचे आचार विचार त्यांची पुढची पिढी अंमलात आणतेय त्यामुळे नागवडे कुटुंबाचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले, व शेवटच्या श्वासापर्यंत नागवडे कुटुंबाचाच मी पाईक राहील अशी ग्वाही दिली अध्यक्षीय मनोगतात श्री बाबासाहेब भोस यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला व अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही हे महाविद्यालय तग धरून राहिले त्याचे कारण बापूंची समर्पित वृत्ती , राजेंद्रदादा नागवडे यांचे प्रशासन व ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे योगदान आहे हे सांगितले, व जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या अनुभवाचा फायदा महाविद्यालयासाठी व्हावा हा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमासाठी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथदादा गिरमकर, लक्ष्मणअण्णा रायकर, मारुतीमामा पाचपुते, विठ्ठलनाना जंगले, प्रा सुरेश रसाळ उपस्थित होते तसेच माजी संचालिका सुरेखाताई लकडे, लगडताई उपस्थित होत्या, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार प्रा सुरेश रसाळ यांनी व्यक्त केले व निवेदन प्रा शंकर गवते यांनी केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.