आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
By : Polticalface Team ,27-05-2025
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन प्रत्यक्षात पिक पाहणी केली असुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले. करमाळा मतदार संघात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेले दोन आठवडे झाले पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे आज करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिवसभर नुकसानग्रस्त भागात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालूका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, कृषी सहायक नितीन रांजून, कृषी सहायक सुप्रिया शेलार, कृषी सहायक राहुल गव्हाणे, कृषी सहायक सचीन सरडे, सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे,आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ संचालक हनुमंत सरडे, विजयराव कोकरे, अजित ननवरे, कैलास बोंदरे आदि उपस्थित होते. या दौऱ्यात शेटफळ येथील शेतकरी रंगनाथ पोळ, मुकूंद पोळ, विजय रामचंद्र लबडे, अनिल प्रल्हाद पोळ तर चिखलठाण येथील शिवाजी नारायण जगताप, कुगाव येथील बळीराम जनार्दन सरडे, प्रशांत लक्ष्मण कामटे आदि शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी, डाळींब, उडीद, कांदा आदि पिकांची प्रत्यक्षात पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधुन दिलासा दिला.यावेळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाण्यासाठी रस्ते नसताना आमदार नारायण आबा पाटील यांनी वेळप्रसंगी ट्रॅक्टर मध्ये बसून तर काही ठिकाणी चिखल तुडवत चालत जाऊन बांधावर हजेरी लावली व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानीचे अहवाल तयार करुन वरीष्ठ कार्यालयात ते सादर करावेत अशा सुचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील गावांसह या मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातही अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अवकाळी मुळे हातातून गेली असून काही ठिकाणी काढणी केलेला कांदा रानात ढिग करुन ठेवले असल्याने तेही हाती लागले नसल्याचे सांगत जिथे मी जाऊ शकत नाही अशा मतदार संघातील सर्वच नुकसानग्रस्त भागात कृषी व महसुल विभागाचे अधिकारी जाऊन अहवाल तयार करतील, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसांगवधान दाखवून तातडीने केलेल्या या भेट व पाहणी दौऱ्यामूळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड
नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.
तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना
शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल