अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

By : Polticalface Team ,02-06-2025

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे



    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात महावितरणकडून घरगुती व व्यवसायिकांना मे महिन्याची देण्यात आलेली वीजबिले मुदत संपल्यानंतर ग्राहक व व्यावसायिकांना देण्यात आली होती. परंतु विलंब आकाराची बिले महावितरण कडून वीज ग्राहकांना मिळाल्यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त करत महावितरण चा सावळा गोंधळ संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी कळवला. याबाबत वृत्तपत्रात ग्राहकांच्या तक्रारी प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या बिलासंदर्भात संबंधित एजन्सीला चांगलेच धारेवर धरल्याची समजते. ग्राहकांच्या तक्रारीनुसार मे महिन्याच्या देयकाची तारीख 19 मे असताना अनेक घरगुती व व्यावसायिक वीजधारकांना बिलाची अंतिम तारीख संपून आठ दिवसानंतर  संबंधितांनी वीज बिले वाटप केले. त्यामुळे नाहक अनेक वीज ग्राहक व व्यवसायिकांना 50 ते 100 रुपयापर्यंत दंड भरण्याची वेळ येऊन ठेपली होती. या गंभीर प्रश्न संदर्भात अनेक वीज ग्राहकांनी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्याकडे महावितरण बाबत तक्रारी केल्या होत्या. पत्रकार कुरुमकर यांनी तातडीने महावितरणचे उपअभियंता श्री इंदुलकर यांच्याशी संपर्क साधून वीज ग्राहकांना मे महिन्याचे विज बिल कोणत्या कारणाने मुदत संपल्यानंतर बिले वाटप केली? असा सवाल उपस्थित केला होता. घरगुती व वीज ग्राहकांना नाहक दंड कशासाठी? असा सवाल केल्यानंतर उपअभियंता इंदुलकर यांनी ज्या वीज ग्राहकांना विलंब देयकाची बिले मिळाले असतील तर त्या वीज ग्राहकांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी. त्या वीज ग्राहकाचा दंड क्षमापित करण्यात येईल व उशिराच्या वीज बिलाचा दंड आम्ही संबंधित एजन्सीच्या नावे टाकू. त्यानुसार अनेक घरगुती वीज ग्राहकांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विलंब आकाराच्या दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक वीजधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


       वीज ग्राहकांच्या म्हणण्यानुसार महावितरण कडून वीज ग्राहकांना दरमहा विजेची बिले पाठवले जातात. वीज ग्राहक देखील प्रामाणिकपणे वीज बिलाचा दंड न होता. तात्काळ वीज बिल बँक; पतसंस्था व फोनपेवर महावितरणचे विजबिल अदा करतात. यावेळेस मात्र महावितरण कंपनीची विजबिले अखेरची भरणा तारीख संपल्यानंतर देण्यात आल्याने वीज ग्राहकांच्या माथी नाहक विलंब दंड भरण्याची वेळ येऊन ठेपली होती. परंतु अनेक वीज ग्राहकांनी पत्रकार कुरुमकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या वीज बिलाचा उलगडा प्रसिद्धीच्या माध्यमातून महावितरणचे निदर्शनास आणून दिला होता. या वृत्ताची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत ज्या वीज ग्राहकांना विलंब भरणा तारीख संपून गेल्यानंतर वीज बिले कुणाला मिळाले असतील तर त्यांनी श्रीगोंदा येथील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून लेखी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक वीज ग्राहकांनी श्रीगोंदा येथील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून वीज बिलाचा विलंब दंड कमी करण्याची मोहीम राबवली आहे. ज्या अन्य वीज ग्राहकांना वीज बिल भरणा विलंबानंतर बिले मिळाले असतील तर त्यांनी तातडीने श्रीगोंदा येथील महावितरण कारल्याची संपर्क साधून लेखी कळविण्यात यावे; असे आवाहन देखील महावितरणचे उपअभियंता श्री इंदुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार कुरुमकर यांनी महावितरणच्या या विलंब बिलाचा प्रश्न योग्य वेळी मार्गी लावल्याबद्दल व्यावसायिक वीज ग्राहक श्री सतीश भगत यांनी पत्रकार कुरुमकर यांचे आभार मानले आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष