राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड
By : Polticalface Team ,04-06-2025
पुणे – अखिल भारतीय संस्कृतिक संघ, पुणे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तबला वादनात श्रेयस रोशन सोनटक्के (वय १२) याने प्रथम क्रमांक पटकावत प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ मे २०२५ रोजी पं. जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले होते.
या अद्वितीय सादरीकरणाला हार्मोनियमवर साथ लाभली ती साने संगीत कला मंच, उरुळी कांचन (पुणे) येथील शिवराज साने यांची. दोघांच्या समन्वयातून रंगलेली ही जुगलबंदी रसिकांच्या मनात ठसली. नृत्य, गायन, वादन, नाट्य आदी विविध सांस्कृतिक कलाप्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.
श्रेयस सोनटक्के यांचे तबल्याचे मार्गदर्शन राजेंद्र नंदकुमार (एन. प्रे. डी. वॉर) सर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहा पेटकर वाघ सर व बुलबुल मॅडम यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय यशामुळे कु. श्रेयस सोनटक्के यांची पुढील आंतरराष्ट्रीय संगीतमय स्पर्धेसाठी थायलंड येथे निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक :