राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
By : Polticalface Team ,04-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा परिषद माजी सभापती कथा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगदरी ग्रामपंचायतीने अथक परिसर घेऊन उभारलेल्या महाआवास घरकुल प्रकल्प राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला असून; केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या शुभहस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; अजित दादा पवार; केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे; ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम; नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे; विस्तार अधिकारी मोशीन मालजपते; सरपंच संजय नागवडे व ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांच्याकडे प्रदान करण्यात आला. सदर प्रसंगी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे; उपसरपंच सौ छाया मासाळ; माजी सरपंच आदेश नागवडे; महेश नागवडे; शिवाजी चोरमले; अशोक पारखे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सरपंच संजय नागवडे यांनी या पुरस्कारा संदर्भांत अधिक माहिती देताना सांगितले की; सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा परिषद माजी सभापती जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाचे 40 गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे एक खास बाब म्हणून वर्ग करून घेतली. व सदर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून आदर्श घरकुल प्रकल्प उभा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायतीने अतिशय बारकाईने लक्ष देऊन स्लॅबच्या 36 घरकुलांचे अतिशय दर्जेदार व सर्व वीज पाणी शौचालय इत्यादी सुविधांनियुक्त चांगले काम करून घेतले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे पाठबळ मिळालेले आहे. सदर प्रकल्पासाठी एक कोटी 22 लाख 50 हजार रुपये खर्च झाला असून; प्रधानमंत्री आवास योजनेतून व गवंडी प्रशिक्षण योजनेतून रुपये 85 लाख निधी प्राप्त झालेला आहे. सदर कामाकरिता पुणे येथील रेल फोॅर फाउंडेशन यांनी 20 लाखाचा निधी दिलेला आहे. उर्वरित रक्कम राजेंद्र दादा नागवडे; यांनी उपलब्ध करून दिली असून; काही रक्कम सरपंच संजय नागवडे यांनी ग्रामपंचायतीचे इतर फंडातून खर्च केलेले आहेत. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील; राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात; तालुक्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकारी यांचे या कामी मौलिक सहकारी लाभले.
सरपंच नागवडे यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; स्व. शिवाजीराव नागवडे बापू यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा घेऊन प्रकल्पाच्या पूर्तते करिता ग्रामपंचायतीचे माजी माजी सरपंच; उपसरपंच; ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी मुरकुटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. सदरच्या प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्यामुळे वांगदरी गावच्या वैभवात मोठी भर पडलेली आहे. संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सदरचा पुरस्कार स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चरणी समर्पित करीत असल्याची भावना सरपंच संजय नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
वाचक क्रमांक :