मृग नक्षत्र सूर्यप्रकाशित ऊन वाढले परंतु पावसाची विश्रांती , श्रीगोंदा तालुक्यातील पावसाची कैफियत

By : Polticalface Team ,09-06-2025

मृग नक्षत्र सूर्यप्रकाशित ऊन वाढले परंतु पावसाची विश्रांती       , श्रीगोंदा तालुक्यातील पावसाची कैफियत नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- 7 जून पासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये उकडगाव; देवदैठण; पिंपरी कोलंदर; राजापूर माठ इत्यादी गावांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार तडका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये या परिसरातील अनेक शाळांचे देखील पत्रे उडाल्याची माहिती समोर येत आहे. वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील झाडे ऊनमळून पडल्याची माहिती देखील समोर येत आहे. मृग नक्षत्रात देखील हवामान विभागाने शेतकऱ्यांना अति सावधानतेचा इशारा दिला आहे. या नक्षत्रामध्ये वाऱ्याचा प्रवाह अधिक असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे चालू वर्षी भरपूर पाऊस पडेल मात्र तितकाच वादळ व वाऱ्याचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान चालू खरीप हंगामासाठी पावसाने वेळेत व मेगगरजेनेसह हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ होते. मात्र दुपारी तीन वाजल्याच्या पुढे आकाशात काळे निळे ढग होऊन वादळी वारा व जोराचा पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या चालू असलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी थांबवले आहेत. हवामान विभागाने देखील 15 जून नंतर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कराव्यात असे आवाहन देखील करण्यात आले आहे. परंतु शेतकरी मात्र थांबायला तयार नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात वापसा होत असतानाच पेरण्या व कपाशीच्या लागवडी केल्याचे दिसून येत आहे. परंतु सततचा पाऊस असल्याने कपाशीचे बियाणे व इतर बियाणे वाया जाऊ नये याची दक्षता देखील शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान रविवारी आठ जून रोजी सकाळपासूनच स्वच्छ व सूर्य प्रकाशित वातावरण दिसून आले. दिवसभर उन्हाची तीव्रता देखील वाढली. मात्र दिवसभर वाऱ्याचा प्रभाव देखील तितकाच कायम दिसून आला. त्यामुळे वाऱ्याचा प्रवाह हा नेमका कोणता इशारा देत आहे? हे देखील तितकेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीला रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत बरसल्यामुळे वातावरणात मोठा गारवा देखील निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे विहिरी; कुपनलिका; ओढे; नाले; बंधारे हे देखील तुडुंब भरल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी वेळेत पाऊस पडला. परंतु सतत पाऊस पडत असल्याने खरीप हंगाम देखील तितकाच लांबणीवर पडताना दिसत आहे. तर काही भागांमध्ये ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत. तिथे मात्र वापसा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी बाजरी; कपाशी; मका इत्यादींच्या पेरण्या केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये अवकाळी व रोहिणी नक्षत्रात पावसाने जोरदार षटकार मारल्यामुळे या तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई मात्र शिथिल झाल्याचे दिसून येत आहे. आता मृग नक्षत्र सात जून पासून सुरू झालेले आहे. या नक्षत्रात वेगवान वाऱ्यासह अति पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील शेती उद्योगाची कामे करताना जीवित हानी व पिकांचे नुकसान होणार नाही. याची तितकीच काळजी घेतली पाहिजे. असे देखील कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल