By : Polticalface Team ,12-06-2025
जन आधार न्युज बारामती (ता. १२ जून २०२५) – बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पथविक्रेते (हॉकर) यांच्यावर बेकायदेशीर कार्यवाही केलेल्याने व पोलीस निरीक्षकांच्या बेकायदेशीर कारवाईवरून आज बारामतीतील हॉकर व सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
बारामती शहरातील पथविक्रेत्यावर बारामती नगर पालिकेच्या वतीने बेकायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात बारामती बंदची हाक देऊन निषेध मोर्चाचे आयोजन पथविक्रेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होती हा मोर्चा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून स्मारक पासून इंदापूर चौक, गुणवडी चौक, महावीर पथ, गांधी चौक, भिगवण चौक, असा मोर्चा काढून नगरपालिके समोर निषेध सभा झाली यावेळी बारामतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
मोर्चातील मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे सादर करत, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका ठेवला. त्यांनी पथविक्रेते संरक्षण व पथविक्रेते विनियमन अधिनियम २०१४ चा भंग केल्याचा आरोप करत, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बारामती नगर परिषद पथविक्रेते समितीच्या सदस्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, पथविक्रेते समितीच्या संमतीशिवाय व सर्वेक्षणाअभावी कोणत्याही विक्रेत्यांवर कारवाई करणे गैरकायदेशीर आहे. तसेच, अनेक विक्रेत्यांचे नुकसान झाल्याचे नमूद करत त्यांची नुकसानीची भरपाई देण्याची ही मागणी करण्यात आली.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या:
1. मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
2. तक्रार निवारण व वाद निर्णय समिती तात्काळ गठीत करावी.
3. सर्व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून हॉकर झोन तयार करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे.
4. बारामती नगरपरिषद पथविक्रेते समितीमधील सर्व सदस्यांची ओळख पत्र द्यावे
5. जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत कोणत्याही पथविक्रेत्यावर कारवाई करू नये.
निवेदनावर बारामती नगरपरिषद पथविक्रेते समिती सदस्य व ए आय एम आय एम पुणे जिल्हाध्यक्ष फैजाज इलाही शेख, राहुल कांबळे, आसिफ शेख, सुधीर घोडके, शुभम अहिवळे यांसह वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे व बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी, विजय जगताप, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार, राष्ट्रवादी(शरद पवार गट) महिला अध्यक्ष आरती गव्हाळे, वंचित महिला तालुका अध्यक्ष सुरेखा लोंढे, अजिज सय्यद, ॲड. अक्षय गायकवाड, RPI चे रविंद्र सोनवणे, राष्ट्रवादी(शरद पवार गट) चे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अस्लम तांबोळी, यांचे सह्या आहेत.
बारामतीमध्ये हॉकर विरोधात कारवाई थांबवून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, त्याचबरोबर मग्रूर मुख्याधिकारी पंकज भुसे यांची त्वरित हकलपट्टी करावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
वाचक क्रमांक :