निलज येथे रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची बैठक संपन्न , हक्काचे पाणी मिळवण्यासाठी गावागावात जाऊन करणार समिती जनजागृती
By : Polticalface Team ,13-06-2025
करमाळा प्रतिनिधी
निलज येथे रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. पुढील लढा काय असायला हवा. येणारे टेक्निकल अडथळे बाबात आणि गावा-गावात जाऊन जनजागृती करून आपणास हक्काचे पाणी कसे मिळेल त्या बाबत पुढील तीव्र लढा उभा करण्याचे अहवाल रिटेवाडी संघर्ष समितीचे अभ्यासक सरपंच अंकुश शिंदे यांनी केले..
या बैठकीचे नियोजन निलज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात सविस्तर आढावा आणि मार्गदर्शन पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, पिंपळवाडीचे सरपंच मदन पाटील, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, बाळासाहेब टकले यांनी उपस्थितीत बैठकी दरम्यान मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक अंगद देवकते यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार पत्रकार राजेश गायकवाड यांनी मांडले. हा लढा यशस्वी करण्यासाठी निलज ग्रामस्थांनी सुध्दा सहभागी राहाण्याचे आश्वासन दिले. यावेळी निलज ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थितीती आढळून आली.रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावा-गावात जाऊन संघर्ष समिती जनजागृती करणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली..
वाचक क्रमांक :