रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

By : Polticalface Team ,14-06-2025

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंद्यातील पंचायत समितीतील बांधकाम विभागामध्ये कर्तव्य बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सिव्हिल इंजिनिअर प्रकाश पाचणकर परिवारामध्ये त्यांच्या घरातील एक सदस्य असणारा रॉकी नावाचा कुत्रा गेली 19 वर्ष त्यांच्या घरात तो राहायला. तो खूप प्रामाणिक होता. पाचणकर कुटुंबीय जर कुठे कामानिमित्त गावाला गेले ते परत येईपर्यंत दरवाजातून तो दुसरीकडे जायचं सुद्धा नाही. आणि कोणाच्या हातचं खायचा ही नाही. पाचणकर मॅडम यांच्या बरोबर तो भजनासाठी नेहमी जायचा. तसेच श्रीगोंद्यातील ग्रामदैवत श्री संत महंमद महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी रॉकी रोज त्यांच्याबरोबर कीर्तनाला जाऊन बसायचा. त्याच्यामुळे सर्व गल्लीतले कुटुंबाचे संरक्षण होत होते. बऱ्याच वेळा चोरट्यापासूनही त्यानी मालकांना व शेजारील मेहत्रे कुटुंबांना वाचवले. रॉकीची पाचणकर कुटुंबीयांनी निवास व्यवस्था देखील अत्यंत चोखपणे ठेवली. उन्हाळी हंगामात रॉकीसाठी फॅन कुलरचा देखील वापर करण्यात आला होता. दररोज स्नान घालून त्याची स्वच्छता अगदी शुद्ध अंतकरणाने ठेवली. त्यामुळे रॉकीला आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे वागवले त्याचा संभाळ केला एक दिवस जरी त्याने अन्न घेतले नाही तर तात्काळ त्याला डॉक्टरांकडून देखील उपचार करण्यात आले परंतु रॉकी काही दिवसापासून नॉर्मल आजारी होता त्याचा वृद्धापकाळ देखील जाणीव करून देत होता. त्यामुळे जो प्राणी प्रामाणिक व सोज्वळ असतो त्यासाठी मानव धर्म म्हणून समाजातील अनेक व्यक्ती देखील तितक्याच पद्धतीने त्या प्राण्याला मायेची उप देत राहते. ती ऊब पाचनकर कुटुंबीयांनी रॉकीला दिली. आज दहा दिवस झाले. रॉकी दारात दिसत नाही; भुंकण्याचा आवाज येत नाही; त्यामुळे पाचनकर कुटुंबियांना आपल्या घरातून काहीतरी हरवल्याची जाणीव वेळोवेळी होताना दिसते. रोकीच्या अचानक जाण्याने पाचनकर कुटुंबीय तसेच गल्लीतील सर्वांनीच तीव्र दुःख व्यक्त केल्याची भावना. शेजारी व पाचनकर कुटुंबांनी सांगितले. रॉकीच्या अंत्यविधी प्रसंगी पाचणकर कुटुंबीय भावनाविवेश झाल्याचे दिसून आले. ज्या प्राण्याने या कुटुंबाचे 19 वर्ष सेवा केली. पाचणकरानी ही त्याचा अंत्यविधी खूप चांगल्या प्रकारे केला. रॉकीला विधीवत पद्धतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वात्सल्य पशुसेवा संस्थेचे शिवाजी पवळ व काही प्राणी मित्र हे रॉकीच्या अंत्यविधीसाठी गेले होते शिवाजी पवळ यांनी रॉकी आजारी असताना वेळोवेळी उपचार देखील त्यांनी केले. त्यामुळे डॉक्टर शिवाजी पवार हे देखील रॉकीच्या निधननंतर भावना विवेश झाल्याचे दिसून आले. रॉकीचा अंत्यविधी प्रसंगी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये रॉकीचा अंत्यविधी करण्यात आला त्यानंतर त्याचा दशक्रिया विधी देखील अगदी शोकाकुल वातावरणात करण्यात आला. पाचणकर कुटुंबीयांसारखे लोक आपल्या मुक्य प्राण्याचा अंत्यविधी करून एक आदर्श त्यांनी समाजासमोर दाखवून दिला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.