श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

By : Polticalface Team ,14-06-2025

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्राचा दररोज जोरदार पाऊस बरसत असल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला पावसामुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान 7 जून पासून मृग नक्षत्राच्या पावसात प्रारंभ झाला आहे. सात जून पासून सतत पाऊस बरसत असल्याने खरीप हंगामाच्या अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामध्ये कपाशी च्या लागवडी केल्या; परंतु सततच्या पावसाने सरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेले आहे. त्यामध्ये उगवण झालेली कपाशी व बाजरी पिके अक्षरशः पाण्यात असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे दुबार पेरणीचे संकट ओढवले गेल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान शनिवारी दुपारी सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसल्यामुळे शनिवारी 13 जून रोजी लिंपणगावचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिंपणगावकरांना अंधारातच रात्र काढावी लागली. गेल्या आठ दिवसापासून मेघगर्जनेसह दररोज पाऊस पडत असल्याने सर्वत्र ओढे; नाले; बंधारे; विहिरी व कुपनलिका तुडुंब वाहताना दिसत आहेत. दरम्यान दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होत नाही. त्यामुळे जमिनीतील वापसा देखील होण्यास उशीर होत आहे. पाऊस वेळेत पडला; परंतु पाऊस काही विश्रांती घ्यायला तयार नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या अक्षरशः खोळंबल्या आहेत. ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत. तिथे मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी; बाजरी; मका; उडीद; सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी व लागवडी केल्या आहेत. मात्र जिथे निचऱ्याच्या जमिनीचा वापसा होत नाही. तिथे मात्र सततच्या पावसामुळे पेरणीला मोठा विलंब होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभी वेळेत पाऊस पडला. उन्हाची तीव्रता देखील त्यावेळी कमी झाली. गारवा वाढला. पाणीटंचाई काही अंशी शिथिल झाली. शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या. परंतु रोहिणी नक्षत्रापासून मृग नक्षत्राच्या मध्यावर पाऊस काही थांबायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल; त्या किमतीत खरेदी केलेले खरीप हंगामाची बियाणे अनुक्रमे कपाशी; बाजरी; मूग; उडीद; सोयाबीन इत्यादींच्या पेरण्या केल्या उगवण झाली; परंतु पावसाचे पाणी मात्र जमिनीतून हटायला तयार नाहीत. त्यामुळे पाऊस जर असाच कायम राहिला तर शेतकऱ्यां समोर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षी सततच्या पावसामुळे खरीप हंगामावर टांगती तलवार असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान शनिवारी दुपारी 12 वाजता ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी बरसल्या. मात्र काही क्षणातच पाऊस पुन्हा गायब झाला ऊन व उकाडा देखील वाढला. मृग नक्षत्रात दररोज पाऊस पडत असल्यामुळे शेती उद्योगाची कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची बी- बियाणे खरेदी केली. परंतु पाऊस काही थांबायला तयार नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडत आहे. याची चिंता मात्र शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षाचा उन्हाळी हंगाम अत्यंत थरारत गेला. उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना श्रीगोंदा तालुक्यात घोड लाभक्षेत्र वगळता सर्वत्र जलसाठा संपुष्टात आला होता. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न अतिशय गंभीर बनला गेला. त्यामध्ये कुकडी लाभ क्षेत्रात पाण्याचा मोठा उन्हाळी हंगामात अगडोंब निर्माण झाला. कुकडीचे आवर्तन सोडले. परंतु पावसाचा अंदाज आल्यानंतर कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. असा आरोप देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून जलसंपदा विभागावर करण्यात येत होता. आवर्तन सोडले. परंतु प्रत्येक तालुक्याला तुटपुंजा कालावधी देण्यात आला. तिथे देखील पाणी वाटपात कात्री मारली. कुकडीचे करमाळ्याला आवर्तन पोहोचले. आणि अवकाळीने श्रीगोंदा तालुक्यासह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. संकटकाळात मेघराजा आमच्यासाठी धावून आला. त्यामुळे आमचे उन्हाळी हंगामातील पिके व पाणी प्रश्न शिथिल झाला. अशा भावना देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू