राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

By : Polticalface Team ,20-06-2025

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड लिंपणगाव (प्रतिनिधी): राजगुरूनगर येथे हिरवाई पर्यावरण समितीच्या राज्यस्तरीय वार्षिक बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी आण्णासाहेब ज्ञानदेव जगताप यांची निवड करण्यात आली. राजगुरूनगर येथे झालेल्या बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी हिरवाई पर्यावरण समिती आणि पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजयकुमार जेठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग चौघुले (सोलापूर) यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम हाती घेण्याबाबत सर्वानुमते चर्चा करण्यात आली. त्यात आझाद मैदान मुंबई येथे झालेले धरणे आंदोलन, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्टोन क्रेशरमुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्यावरून सर्व स्टोन क्रेशरची वास्तविकता तपासणी त्यावर संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, विविध मोर्चे, आंदोलन निश्चित करणे, याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणे, तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे व विविध ठिकाणी वृक्षलागवड करणे याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. त्यानुसार सर्वांनी वरील विषयांना मंजुरी घेऊन सभा पार पडली. या बैठकीस विजयकुमार जेठे, पांडुरंग चौघुले (सोलापूर); संजय गायकवाड नाशिक; (पर्यावरण समिती उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख) शांताराम भोसले (सातारा); माधव सरतापे (छत्रपती संभाजीनगर); आण्णासाहेब जगताप (श्रीगोंदा); संभाजी कापसे (नेवासा); सत्यवान शिंदे (पुणे); इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. आण्णासाहेब जगताप यांच्या निवडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन भैय्या पाचपुते; महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे; नागवडे कारखान्याचे संचालक शरदराव जगताप; जिल्हा शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन अविनाश निंभोरे; माजी चेअरमन बापूराव शिंदे; चेअरमन माधव जगताप सर; बाळासाहेब साळुंके गुरुजी; संजय रायकर सर; रमेश कळमकर; शरद खोमणे; डॉ. उमेश हांडे; डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.