By : Polticalface Team ,24-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा दहा दिवसानंतरचा ब्राझील देशाचा अभ्यास पूर्ण दौरा यशस्वी झाल्यानंतर नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सभासद कामगार व संचालक मंडळाकडून भव्य असा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते.
व्यासपीठावर कारखान्याचे जेष्ठ संचालक सुभाषराव शिंदे; विश्वनाथ गिरमकर; सावता हिरवे; बंडू जगताप; लक्ष्मण रायकर; प्रशांत दरेकर; राकेश पाचपुते; डी आर काकडे; दत्तात्रय कातोरे; ज्ञानदेव खरात; शरद जगताप; आदेश नागवडे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविकात ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की; सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या नंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी सक्षमपणे सहकारी साखर कारखानदारी चालवली. सभोवताली अनेक खाजगी कारखान्यांची स्पर्धा उभी असताना राजेंद्र दादा नागवडे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यातून श्री नागवडे यांचे निश्चितपणे साखर कारखानदारी व शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभणार असल्याचे सांगितले.
कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की; महाराष्ट्रमध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. त्यातून सहकाराचे गाढे अभ्यासक राजेंद्र दादा नागवडे यांची निवड ही अभिमानास्पद ठरली आहे. राजेंद्र नागवडे यांनी बापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ही सहकारी साखर कारखानदारी उत्तम प्रकारे चालवली. असे सांगून ते पुढे म्हणाले की; साखर कारखान्याबाबत सहकार महर्षी बापूंची जी भावना होती. तीच भावना राजेंद्र नागवडे यांची आहे. आपल्या कुटुंबापेक्षाही नागवडे कुटुंबांनी या साखर कारखानदारीवर जीवापाड प्रेम ठेवले. म्हणूनच आज अनेकांचे प्रपंच फुलले आहेत. या अभ्यास दौऱ्यातून साखर कारखाना व सभासदांची मोठी भरभराट होईल; अशी अपेक्षा श्री भोस यांनी यावेळी व्यक्त केली.
* यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक दत्तात्रय कातोरे; ज्ञानदेव खरात यांच्यासह तीन सेवानिवृत्त साखर कामगारांचा सन्मान यावेळी राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की; नॅशनल फेडरेशनच्या वतीने ब्राझील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. या देशामध्ये गेल्यानंतर अनेक बाबी समजून घेता आल्या. त्यातून काम करण्याची संधी व प्रेरणा मिळते. ब्राझील दौरा हा 22 तासाचा ठरला. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; ब्राझील देशात भौगोलिक आणि नैसर्गिक वातावरणात मोठा अमुलाग्र बदल दिसून आला. या देशांमध्ये एका शेतकऱ्याकडे कमीत कमी 25 ते 30 हेक्टर जमीन असून; शेती ही पूर्णतः यांत्रिकी व आधुनिक पद्धतीने दिसून आली. तेथे फक्त पावसावर शेतीची वाटचाल आहे. विहिरी; कुपनलिका; विजेवर चालणारी विद्युतपंप; व कालवा नाही. त्यामुळे तेथे पावसावरची शेती ही येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली दिसून आली. ब्राझीलमध्ये ऊस; सोयाबीन ही पिके जास्त प्रमाणात आहेत. येथील जमीन ही चांगली सुपीक आहे. या देशात शंभर टक्के ऊस शेतीचे उत्पादन दिसून आले. तेथील शेतकऱ्यांचे बारा महिने काम चालू आहे. महाराष्ट्रातील कारखाने व ब्राझीलमधील कारखान्यांमध्ये अत्यंत मोठा बदल आहे. पावसावर ऊस शेती असल्यामुळे ऊसाची रिकवरी मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यातून भरघोस उत्पन्न देखील मिळते. तेथील शेतकरी सूक्ष्मपणे शेती करतात. त्यामुळे ब्राझील देश हा प्रगतशील देश गणला जात आहे. या देशात इथेनॉलचा जास्त वापर असल्यामुळे तेथील कुठेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे आरोग्य ही उत्तम प्रकारे दिसून आले. याबरोबरच त्या देशातील अनेक बाबी ह्या डोळ्याचे पारणे फेडावे अशा प्रकारे दिसून आल्या. या अभ्यास दौऱ्यातून निश्चित प्रकारे साखर कारखान्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याबरोबरच पुढील गाळप हंगामात दररोज सात हजार मे. टनाने साखर कारखाना चालेल यासाठी प्रयत्न करू. यासाठी साखर कारखाना कामगारांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे श्री नागवडे यांनी सांगून अभ्यास दौऱ्यानिमित्त सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले
यावेळी उपस्थित सभासद कामगार कार्यकर्ते व हितचिंतकांचे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष