स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
By : Polticalface Team ,03-07-2025
भिमसेन जाधवपुणे जिल्हा.प्रतिनिधीपंढरपूर वारीसाठी पायी निघालेल्या एका सामान्य कुटुंबावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास गंभीर प्रकार घडला आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या साथीदारासह धारदार शस्त्राचा (कोयता) धाक दाखवून कुटुंबाला लुटले. त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेची नोंद दौंड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, घटनेच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके गठित करण्यात आली आहेत. सदर आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून, त्याद्वारे त्याचा शोध घेण्यात येत आहे.कोणालाही या रेखाचित्रातील व्यक्तीची माहिती असल्यास कृपया खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.Dysp दौंड श्री. बापुराव दडस - 9049664673सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल गावडे (स्थगुशा, पुणे ग्रामीण) – 9823165080सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्ताजी मोहिते (स्थगुशा, पुणे ग्रामीण) – 8308844004पोलीस प्रशासन जनतेच्या सहकार्याने या अमानुष घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाआड करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :