शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,07-07-2025

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ जुलै २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ ता दौंड जिल्हा पुणे येथील राहणार श्री पृथ्वीराज संपतराव शितोळे यांच्या २३ हजार रूपये किंमतीच्या तीन गावरान जातीच्या शेळया चोरट्यांनी पहाटे 03ः वाजे सुमारास घरा जवळ असलेल्या जनावराच्या गोठयातुन चोरी करून नेल्या असल्याची धक्कादायक घटना दि.03/07/2025 रोजी पहाटे 03 वाजे सुमारास घडली या बाबत अधिक माहिती अशी की मौजे कुरकुंभ ता दौंड जिल्हा पुणे गाव हद्दीतील शितोळे वस्ती येथील शेतकरी पृथ्वीराज संपतराव शितोळे यांच्या तीन शेळ्या चोरी झाल्याचे तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे तीन आरोपी विरुद्ध .रजि नं 449/2025 भा.न्या.संहिता कलम 303(2),3(5) अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. दौंड पोलीस स्टेशन येथे श्री पृथ्वीराज संपतराव शितोळे वय 40 वर्षे धंदा शेती रा.शितोळे वस्ती कुरकुंभ ता दौंड जि पुणे.यांच्या फिर्यादी वरून सदर आरोपी-1) प्रविण विजय चव्हाण वय 22 वर्षे रा.कागल्ली अकलुज ता माळशिरस जि सोलापुर  2) करण महादेव चव्हाण 3) माऊली लोंढे दोन्ही रा.माळी नगर ता माळशिरस जि सोलापुर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक 03/07/2025 रोजी पहाटे 03 वाजे सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्वजण घरामध्ये झोपले होते अचानक बाहेर कुत्रा भुंकल्याचा व शेळी ओरडल्याचा आवाज आला म्हणुन फिर्याद व भाऊ अतुल संपतराव शितोळे घराचे बाहेर येवुन जनावराचे गोठयाकडे पाहीले असता तीन इसम जनावराचे गोठयातुन तीन शेळया चोरुन त्यांचेकडे असलेल्या चारचाकी गाडीच्या डिकीमध्ये शेळया टाकुन पुणे सोलापुर हायवे रोडने जात असताना दिसले तेव्हा फिर्यादीने पोलीसांना फोन केला सदर घटनेची खबर मिळताच तत्काळ पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली फिर्यादी व पोलीसांनी शेळ्या घेवुन जाणा-या गाडीचा पाठलाग करून मौजे मळद गावचे हद्दीत सोलापुर बाजुकडे जाणाऱ्या हायवे लेनचे बाजुला पहाटे 03.15 वाजे सुमारास चोरट्यांची गाडी थांबविली तेव्हा शेळया घेवुन जाणा-या गाडीतील दोन इसम अंधारामध्ये पळुन गेले व एकास पोलीसांनी जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रविण विजय चव्हाण वय 22 वर्षे रा.सवत गव्हाण ता माळशिरस जि सोलापुर   तसेच पळुन गेलेल्यांची नावे 2) करण महादेव चव्हाण 3) माऊली लोंढे दोन्ही रा.माळीनगर ता माळशिरस जि सोलापुर असे असल्याचे सांगीतले तसेच सदरची चोरी आम्ही तिघांनी मिळुन केल्याचे सांगितले त्याचे ताब्यातील चारचाकी गाडीची पहाणी केली असता काळया रंगाची होन्डा सिटी गाडी नं.एम.एच.12/एफ.यु/1000 अशी असुन त्याची डिगी उघडुन पाहीली असता त्यामध्ये फिर्यादीच्या तीन चोरी गेलेल्या शेळया मिळुन आल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1) 10 हजार रूपये किंमतीची गावरान जातीची तांबडया पांढ-या रंगाची सहा वर्षाची शेळी. किं.अं 2) 8 हजार रूपये किंमतीची गावरान जातीची काळया तांबडया रंगाची तीन वर्षाची शेळी किं.अं 3) 5 हजार रूपये किंमतीची गावरान जातीची पांढ-या तांबडया रंगाची दोन वर्षाची शेळी किं.अं एकुण 23 हजार-रूपये किंमतीच्या तीन गावरान जातीच्या शेळया जनावराच्या गोठयातुन चोरी करून नेल्या आहेत. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार शिंदे. पोलीस हवालदार पठाण पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक