अहमदनगर लहुजी युवा सेनेच्या शहरप्रमुख पदी वसंत कोरडे यांची निवड
By : Polticalface Team ,Wed Feb 02 2022 15:47:07 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील भालगांव येथील माजी सैनिक वसंत रंगनाथ कोरडे यांची नुकतीच भारतीय लहुजी युवासेनेच्या अहमदनगर शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.
अहमदनगर येथील साईनगर डेरी फार्म रोड, भिंगार येथे झालेल्या बैठकीत राज्य प्रमुख अभिमान कांबळे यांचे आदेशाने पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख संजय ससाणे यांचे हस्ते कोरडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. गतकाळातील त्यांच्या सामाजिक कार्या मधील निरीक्षणानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी वसंत कोरडे म्हणाले, माझी नगर शहर प्रमुख पदी निवड केल्याबद्दल प्रथम ससाणे साहेब व कांबळे साहेब यांचे मी आभार मानतो. संघटनेचे कुठलेही सामाजिक कार्य असो, त्या कामांमध्ये मी तत्परतेने त्या कार्यात उतरेल. तसेच सर्वांच्या मदतीला अहोरात्र धावून येईल. संघटनेने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी मी निश्चित पार पाडेल तसेच या संघटनेच्या बळकटीसाठी जरूर प्रयत्न करेन.
या निवडीच्या प्रसंगी माजी सैनिक भाऊसाहेब मंचरे, मेजर संजय ढाकणे, मेजर जेधे, निलेशभाऊ साबळे तसेच साईनगर डेरी फार्म रोड येथील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :