By : Polticalface Team ,Fri Feb 04 2022 09:33:07 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी आष्टी येथील माजी सरपंच नामदेव भाऊ राऊत यांचे वडील रघुनाथ अण्णा राऊत यांचे 03 फेब्रुवारी रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.ते उर्दू भाषेचे हाडाचे विद्यार्थी होते.बोली भाषेतही त्यांच्यावर उर्दू भाषेचा प्रभाव होता.स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचा जन्म असल्यामुळे त्या काळात उर्दू शिकली आणि बोलली जात होती.ते माझे चुलते सय्यद अहमद गुरुजी यांचे वर्गमित्र होते आणि वडील सय्यद अमिनुद्दिन गुरुजी यांचे ते मित्र होते.त्यांच्याकडे अनेक वर्ष शासकीय स्वस्त धान्य दुकान होते. त्या स्वस्त धान्य दुकानातून सामान आणण्या साठी वडील आम्हाला उर्दू भाषेत चिठ्ठी लिहून देत असत. त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू होता. ते दानशूर वृत्तीचे होते.अनेक मान्यवर, जनसमुदाय त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होता. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली. असेही कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन म्हणाले.
वाचक क्रमांक :