पेडगाव हद्दीतील नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर अवैध वाळू उपश्यासह गावात सुरू असणारे मटका,दारू विक्री,जुगार यांच्यावर कारवाईच्या मागणीचा ठराव पेडगाव ग्रामपंचायतीने मासिक मीटिंग मध्ये केला
By : Polticalface Team ,Fri Feb 04 2022 13:10:28 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा -(अनिल तुपे)-
पेडगाव हद्दीतील नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर अवैध वाळू उपश्यासह,वाळूची वाहतूक तसेच अवैध माती,मुरूम उतखनन व वाहतूक तातडीने बंद करावी तसेच गावात सुरू असणारे मटका,दारू विक्री,जुगार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत या मागणीचा ठरावच श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने त्यांच्या मासिक मीटिंग मध्ये केला आहे.
या ठरावाची प्रत श्रीगोंदा पोलीस स्टेशन व महसूल विभागाला देऊन संबंधित व्यवसायांवर कडक कारवाई करून ते बंद करण्याची मागणी देखील ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली आहे.
या ठरावात म्हंटले आहे की,पेडगाव हद्दीतील नदीपात्र व त्याच्या बाजूच्या भागात सध्या जोरदार अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे वाळूसाठी बाहेर गावातून अनेक लोक या ठिकाणी येत आहेत वनविभागाच्या हद्दीत वृक्ष तोड करून सर्रासपणे वाळूचा उपसा व वाहतूक सुरू आहे या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत.
तसेच दारू पिणाऱ्या व्यक्ती शाळेसमोर येऊन त्रास देतात,मटका,जुगार चालवणाऱ्यांची दादागिरी वाढली असून या सर्वांचा सामान्य लोकांना,विद्यार्थ्यांना त्रास होत असल्यामुळे या अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करून ते व्यवसाय बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
ग्रामपंचायतीने पुढाकार घेत वाळू उपश्यासह,अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचा सर्वानुमते ठराव संमत केला आहे याबाबत त्यांनी पोलीस महसूल विभागाच्या देखील ठरावाची प्रत दिली आहे त्यामुळे आता पोलीस व महसूल कारवाई बाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल
*वनविभागाच्या बघ्याच्या भूमिकेमागचे कारण समजत नाही .
वनविभागाच्या हद्दीत वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन व वाहतूक होत असताना सुद्धा श्रीगोंदा वनविभागाचे अधिकारी याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत राजरोसपणे त्यांच्या हद्दीत वाळूउपसा होत असूनसुद्धा वनविभाग मूग गिळून गप्प का आहे?त्यांनी कारवाई न करण्या मागे काय कारण आहे का? हप्ते वसुलीमुळे बघ्याची घेतात अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसतेय .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी