कामगारांसोबत ऋषिकेश ढाकणे यांनी घेतला चटणी-भाकरीचा आस्वाद
By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:06:16 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
-संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी टाकळीमानूर परिसरातील ऊसाच्या फडात ऊस तोडणी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तोडणी कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडात "चटणी-भाकरीचा" आस्वाद घेतल्याने कामगारही भान हरपून गेले.
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांचा टाकळीमानूर येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाच्या संदर्भात अनेक विषय मांडले.
टाकळीमानूर परिसरात ऊस उत्पादकांच्या मागणीवरून मागील आठ दिवसांपासून केदारेश्वर कारखान्याने ऊस तोडणीसाठी कामगारांच्या टोळ्या पाचारण केल्याने या परिसरातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे.अशाच एका ऊसाच्या शेतात ढाकणे यांनी भेट देत ऊस तोडणी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कारखान्याकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलतांना कामगारांनी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या तोडणी कामगारांच्या संघर्षबाबाबत उल्लेख करीत, आज ज्या सुविधा व कष्टाचा मोबदला आम्हाला मिळतोय, त्याला बबनराव ढाकणे यांचा ऊस तोडणी कामगारांसाठीचा केलेला संघर्ष कारणीभूत असल्याचे निक्षूण सांगितले. ज्या घटकाला कारखानदारांच्या पिळवणुकीतून पोटाची खळगी भरावी लागायची, त्याविरोधात बबनरावांनी उभारलेला लढा, आम्हाला न्याय व सन्मान मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी ऋषिकेश ढाकणे यांच्याकडे कृतज्ञतापूर्वक सांगितले.
यानंतर ऋषिकेश ढाकणे यांनी कोयता हातात घेत ऊसही तोडला व कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडातच बसकण मांडत कामगारांसोबत ‘चटणी-भाकरी’ चा आस्वाद घेतला.
यावेळी बोलतांना ऋषिकेश ढाकणे म्हणाले, केदारेश्वर कारखाना ऊस तोडणी कामगारांच्याच मालकीचा असून यंदापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्याने फारशा गळीताच्या अडचणी येत नाहीत. कारखाना कार्यक्षेत्र व बाहेरील असे मिळून जवळपास सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट बाळगून असून, शेतकी विभागाने व्यवस्थित नियोजन केल्याने नोंदीनुसार ऊस तोडणी सुरु आहे.
यावेळी राजेंद्र नागरे, दादासाहेब बारगजे आदी हजर होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी