मैत्रेयी ग्रुपच्यावतीने हळदीकुंकू व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान समारंभ
By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:07:11 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पारंपारिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली, तरी अजूनही ग्रामीण तसेच शहरी भागातील स्रीयांनी अनेक पारंपारिक सणांचे महत्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक सण म्हणजे मकरसंक्रांती. घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करत बरेचदा स्त्रीला मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते, म्हणून वर्षातून एकदातरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम तिला विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी पुरेसे ठरतात.
काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते दृढ करत पर्यावरणपूरक वस्तू, वाण म्हणून देणे. पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी वाढविण्याचे काम करते, असे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता अभय आव्हाड यांनी केले.
त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात मैत्रेयी ग्रुप आयोजित हळदी कुंकू व सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर दिपाली बंग, रुपाली काकडे, लता सबलस, माधुरी पैठणकर, मीना मरळीकर, मनीषा सबलस, नंदा आव्हाड, प्रणिता नरवणे, रीना टेके, विजया डोईफोडे, उषा भालेराव, विजया डाके, स्नेहा लाड आदी उपस्थित होत्या.
कविता आव्हाड पुढे म्हणाल्या, पाथर्डी शहरातील गोरगरीब, कष्टकरी व उपेक्षित महिलांसाठी मैत्रेयी ग्रुप २००९ पासून कार्यरत असून महिलांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, कष्टकरी महिलांना सहाय्य असे वेगवेगळे उपक्रम मैत्रेयी ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातात. यावेळी सर्व महिलांना वाण म्हणून पर्यावरणपुरक व आयुर्वेदिक महत्व असलेली तुळस वनस्पती देण्यात आली. सामाजिक कार्य करणाऱ्या माधुरी पैठणकर व मीना मरळीकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या विविध क्रीडा प्रकारात पदके मिळविलेल्या योगिता खेडकर, सृष्टी गर्जे, कोमल वाकडे, सुवर्णा राठोड, निकिता क्षीरसागर, श्रुती खेडकर, अमृता खाटिक, ट्रेकर अर्चना गडधे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष मदत म्हणून शहरातील मथाबाई काळोखे या निराधार महिलेला अभय आव्हाड प्रतिष्ठानमार्फत घरासाठी निवारा म्हणून लोखंडी पत्रे व इतर साहित्य देण्यात आले.
दिपाली बंग आणि माधुरी पैठणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेश्मा सातपुते, सुत्रसंचालन अनुजा कुलकर्णी तर आभार प्रणिता भावसार यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात बालगायक राजरत्न डोळस यांच्या प्रार्थना गायनाने झाली तर शेवट पसायदानाने करण्यात आला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.