थोरात कुटुंबातील तीन जणांची पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेत निवड फुले- शाहू- आंबेडकर चळवळीच्या वतीने केला सत्कार

By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:11:19 GMT+0530 (India Standard Time)

थोरात कुटुंबातील तीन जणांची पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेत निवड फुले- शाहू- आंबेडकर चळवळीच्या वतीने केला सत्कार पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील माळेगाव येथील सुंदर थोरात यांच्या कुटुंबातील दोन मुले व एक मुलीचा पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाने नुकतीच निवड केली आहे. थोरात यांच्या दोन मुलांची मुंबई येथे पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड तर मुलीची रेल्वे पोलीस पदी निवड करण्यात आली. थोरात कुटुंबांनी गरीब परिस्थितीवर मात करून सर्वच तीन मुलांना शिक्षण देऊन पोलिस भरतीमध्ये त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश आले आहे. त्यांची पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या तीन पोलीस कॉन्स्टेबल चा सत्कार फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या वतीने पाथर्डी येथील आंबेडकर भवन येथे सत्कार करण्यात आला. माजी नायब तहसीलदार जगदीश गाडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी पाथर्डी पंचायत समितीच्या उपसभापती मनिषा वायकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य दिलिप सरसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्ध फुले शाहु आंबेडकर चळवळीचे पाथर्डी तालूक्याचे नेते व छत्रपती शाहु महाराज पतसंस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष दिगंबर गाडे यांनी केले. त्यांच्या या निवडीबद्दल श्री तिलोक जैन विद्यालयाचे मुख्य लिपिक महेद्र राजगुरू, हाजी हुमायुन आतार, कार्यक्रमाचे आयोजक व माजी नायब तहसीलदार जगदिश गाडे, स्वामी सर्मथ पतसंस्था पाथर्डीचे व्हाईस चेअरमन एकनाथ ठोकळ, माजी प्राचार्य दिलीप सरसे, सौ. राजगुरू, बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे आदींनी त्यांचे मनोगत व्यक्त करून अभिनंदन केले. या वेळी आरपीआयचे योगेश दौंडे , माजी मुख्याध्यापिका मंदाकिनी जगदिश गाडे तसेच थोरात कुटुंबातील सर्व सदस्य व माळेगाव येथील बहुसंख्येने ग्रामस्त उपस्थित होते. बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष