चिखली व टाकळी काझी सबस्टेशनची कामे लवकरच सुरु होणार- आ. बबनराव पाचपुते.

By : Polticalface Team ,Sun Feb 06 2022 18:42:25 GMT+0530 (India Standard Time)

चिखली व टाकळी काझी सबस्टेशनची कामे लवकरच सुरु होणार- आ. बबनराव पाचपुते. श्रीगोंदा प्रतिनिधी. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली व नगर तालुक्यातील टाकळी काझी या दोन वीज सबस्टेशनला मंजुरी मिळाली असून निधीची तरतूद झाली असल्याने लवकरच कामे सुरू होणार असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले तसेच काष्टी नळपाणी पुरवठा योजनेला सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला असल्याचे हि पाचपुते यांनी सांगितले. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात वीजेच्या अडचणी निर्माण होत होत्या म्हणून या परिसरातील गावांच्या वीजेच्या प्रश्न सोडविण्यासाठी या भागात सबस्टेशन होणे आवश्यक होते म्हणून आपण शासन दरबारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे पाठपुरावा केला असुन चिखली व नगर तालुक्यातील टाकळी काझी या दोन वीज उपकेंद्राना निधीची तरतूद झाली असुन लवकरच कामे सुरू होणार असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले आहे.तसेच घारगाव,घोटवी व हिरडगाव वीज उपकेंद्रासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे तसेच लोणी व्यंकनाथ येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ही आ. पाचपुते यांनी सांगितले. काष्टी नळपाणी योजनेसाठी अतिरिक्त साडेपाच कोटींचा निधी मंजूर- आ.पाचपुते काष्टी नळपाणी योजनेतील गवतेवस्ती येथे पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ५कोटी६१लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली. तसेच काष्टी गावासाठी घोड धरणावरुन नळपाणी योजना आणली आहे पण या योजनेतून काही वाड्या वस्त्यांना पाणी जाण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा करून गवतेवस्ती येथे पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झाला असल्यामुळे पाणी योजनेतील अडथळे दूर झाले असल्याने लवकरच सर्व पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे असे शेवटी आ. पाचपुते यांनी सांगितले **** चौकट- माझ्या तब्येतीची काळजी विरोधकांनी करु नये-आ.पाचपुते माझी तब्बेत ठणठणीत असुन तालुक्यातील व मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे माझ्या तब्येतीची काळजी करण्यासाठी माझी जनता सक्षम आहे विरोधकांनी माझ्या तब्येतीची काळजी करू नये असे असा सल्लाही आ.पाचपुते यांनी विरोधकांना दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी