समाजातील दुर्गुण,दुराचार,विकृती नष्ट करण्याचे काम संस्कारी शिक्षणातून होते याला अधिकाधिक चालना मिळण्याची गरज - पोलीस अधीक्षक मनोज पाटील

By : Polticalface Team ,Sun Feb 06 2022 22:01:06 GMT+0530 (India Standard Time)

समाजातील दुर्गुण,दुराचार,विकृती नष्ट करण्याचे काम संस्कारी शिक्षणातून होते याला अधिकाधिक चालना मिळण्याची गरज - पोलीस अधीक्षक मनोज पाटील श्रीगोंदा(प्रतिनिधी):-केवळ पोलिसांची संख्या वाढवून गुन्हेगारी कमी होणार नाही कारण गुन्हा करण्याची इच्छा मनातून होते अशावेळी सर्वसामान्य लोकांमध्ये संस्कार करून सदाचार करण्यासाठी होणारे प्रयत्नच गुन्हेगारी कमी करतील आणि हे काम कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथील श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित वारकरी संप्रदाय निवासी आश्रम शाळेद्वारे सुद्रीक महाराज,वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे पाटील,डॉ.शिल्पा थोरात करत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आश्रम शाळा भेटी प्रसंगी काढले या आश्रम शाळेत लहान गरीब अनाथ मुलांना शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण देऊन परिपूर्ण नागरिक घडविण्यासाठी सुद्रीक महाराज,विठ्ठलराव वाडगे आणि पुण्यातील डॉक्टर थोरात मेहनत घेत असल्याचे पाहून मनोज पाटील यांनी आश्रम शाळेला भेट देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले ते म्हणाले प्रवचन मध्ये भाग घेतच मी मोठा झालो याची ताकद मोठी आहे किंबहुना पोलिसांचेच काम महाराज मंडळी करत असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरू नये असेही म्हणत समाजातील दुर्गुण,दुराचार,विकृती नष्ट करण्याचे काम संस्कारी शिक्षणातून होते याला अधिकाधिक चालना मिळण्याची गरज आहे या आश्रम शाळेला सामाजिक बांधिलकी तुन विठ्ठल राव वाडगे आणि नेहमी सामाजिक उपक्रमात भाग घेणाऱ्या डॉक्टर शिल्पा थोरात यांनी लक्ष घातल्याने शाळेची उत्तरोत्तर प्रगती होईल शिवाय आपण देखील मदत करू असा मानस व्यक्त केला यावेळी डॉ.थोरात यांनी भविष्यात करिअर निवड बाबत मुलामुलींशी संवाद साधत मार्गदर्शन केले तर सुद्रीक महाराज यांनी संस्था चालवताना अडचणी आल्या पण विठ्ठलराव वाडगे यांनी कोरोना काळात अन्न-धान्य पुरविण्या बरोबरच संगणक लॅब उभी करून मुलामुलींमध्ये चैतन्य निर्माण केल्याचे सांगत मुलींच्या वसतिगृहाबाबत माहिती दिली प्रस्तविकात शरद गावडे यांनी संस्था परिचय आणि मदती बाबत तसेच मनोज पाटील यांच्या कर्तवदक्षते बाबत माहिती दिली कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव,कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, विठ्ठलराव वाडगे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के,प्रा मधुकर खोमणे,सुधाकर वांढेकर आदी यावेळी उपस्थित होते. ----------------------------------- चौकट-पोलीस खात्यात येण्यापूर्वी मी शिक्षक होतो सदरक्षणाय खलनिग्रहनाय ब्रीद चा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश असा होतो पण दुर्दैव अस की पोलीस खात्यात आल्यावर सज्जनां ऐवजी दुर्जन लोकांशीच जादा संपर्क येतो पण आज आश्रम शाळेत येण्याचा योग येताच हे निमंत्रण टाळले नाही येथे येऊन समाधान वाटले-मनोज पाटील,पोलीस अधिक्षक, नगर
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष